आज्या-शीतलीने दिलंय लग्नाचं निमंत्रण...केलं फेसबुक लाईव्ह

झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेत आज्या आणि शितली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Updated: May 22, 2018, 05:49 PM IST
आज्या-शीतलीने दिलंय लग्नाचं निमंत्रण...केलं फेसबुक लाईव्ह title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेत आज्या आणि शीतली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वत: आज्या आणि शीतलीने या लग्नाचं आमंत्रण दिलंय. फेसबुक लाईव्ह करुन त्यांनी या लग्नाचं निमंत्रण प्रेक्षकांना दिलंय. येत्या ३० मेला त्यांचा विवाहसोहळा संध्याकाळी सात वाजता संपन्न होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या सोहळ्याला हजेरी लावावी असे आवाहन या दोघांनी केलंय. आज्या आर्मीत भरती झालाय. या दोघांच्या प्रेमाचे रुपांतर आता नात्यात होतेय. ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल ५मध्ये आहे. 

देशप्रेमाने भारावलेला आज्या आणि शीतलीच्या प्रेमकहाणीवर आधारित ही मालिका आहे. आज्याच्या मनातील देशप्रेम, देशासाठी काहीही करण्याची तयारी...त्याच्या या स्वभावामुळेच शीतलचे त्याच्यावर प्रेम जडते. आधी एकमेकांचे कट्टर दुश्मन असणारे हे दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर सुरु होती त्यांची प्रेमकहाणी...