'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals

Kubbra Sait Birthday Special : कुब्रा सैतचा आज 40 वा वाढदिवस आहे. कुब्रानं यंदाच्या वर्षी तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून आता ती बॉयफ्रेंडच्या शोधात असल्याचं सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 27, 2023, 01:35 PM IST
'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals title=
(Photo Credit : Social Media)

Kubbra Sait Birthday Special : 'सेक्रेड गेम' फेम अभिनेत्री कुब्रा सैतचा आज वाढदिवस आहे. आज कुब्रा तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. कुब्रा ही फक्त 'सेक्रेड गेम' किंवा 'द ट्रायल' या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयासाठी नाही तर आणखी अनेक दमदार चित्रपटासाठी ओळखली जाते. कुब्रानं आजवर तिच्या करिअरवर पूर्ण लक्ष दिलं होत. आता आयुष्याच्या एका नव्या टप्याला कुब्रा सुरुवात करत आहे. याच टप्यावर कुब्रानं तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. आता 40 शीत पदार्पण केल्यानंतर कुब्राचं सगळ्यात पहिलं काही काम असेल तर ती बॉयफ्रेंड शोधणं असं तिनं सांगितलं आहे. 

कुब्रा सैतनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कुब्रा म्हणाली की 'माझ्यासाठी खरा टर्निंग पॉइंट ही गेली दहा वर्षे होते जेव्हा मी 30 वर्षांचे झाले. आता या नवीन वर्षात मी स्वत: ला शांत पद्धतीनं पुढे घेऊन जाणार आहे, कारण जर आज माझ्या आयुष्यात इतकी अडचण किंवा गडबड असेल तर विचार करा गेल्या दहा वर्षांपूर्वी हे सगळं कसं असेल.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे कुब्रा म्हणाली 'गेली दहा वर्षे ही माझ्यातल्या अनेक गोष्टी शोधून काढण्यासाठी योग्य होती. आता येणाऱ्या दशकात म्हणजे आजपासून, मी स्वत: ला खूप शांत ठेवणार आहे. मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे ही माझ्या प्रोफेश्नल आयुष्यात असलेल्या गोल्सच्या मागे धावण्यात गेली. आज, मी एका चांगल्या ठिकाणी आहे. मला अशा गोष्टी करते ज्या केल्यानं मला स्वत: चा अभिमान वाटतो. कारण एक व्यक्ती म्हणून माझ्या प्रोफेश्नल आयुष्यात मी सगळ्या गोष्टी मिळवल्या आहे, पण खासगी आयुष्यात, ते मी बऱ्याच काळापासून मी दुर्लक्ष करते. आता यंदाचं वर्ष हे माझ्या खायगी आयुष्यातील काही गोल्सवर लक्ष केंद्रित करण्याकडे जाणार आहे. याची सुरुवात बॉयफ्रेंड शोधण्यापासून आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : आफ्रिकेतील सेट ते हॉलिवूड दिग्दर्शक...; RRR Sequel बद्दल समोर आली महत्त्वाची माहिती!

कुब्राच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिला पाहिल्यानंतर कोणीही कुब्रा ही 40 शीत पोहोचल्याचे म्हणू शकत नाही. कुब्रानं 2010 साली तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 13 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत तिनं 8 चित्रपट आणि अनेक वेब सीरिज केल्या आहेत. 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमुळे कुब्राला लोकप्रियता मिळाली. त्या वेब सीरिजसाठी 2019 साली तिला पुरस्कार देखील देण्यात आला होता. या सीरिजमध्ये तिनं तृतीयपंथी भूमिका साकारली होती. तर या वेब सीरिजशिवाय कुब्रा सुल्तान, रेडी, सिटी ऑफ लाइफ आणि गली बॉय सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.