मुंबई : कॉमेडी कलाकार कपिल शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.
कपिल शर्मासोबत रोज नव्या घटनांमुळे मीडियामध्ये हेडलाईन्स बनत आहेत. नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकलेल्या कपिल शर्माला बाहेर पडायला वेळ देण्यात आला. याकाळात कपिल टेलिव्हिजनपासून दूर गेला. काही दिवसांपूर्वी त्याने कॉमेडी शो सुरू केला. मात्र ट्विटरवर काही वादग्रस्त ट्विट लिहल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शिंदेने पोस्ट शेअर करून कपिल शर्माला स्पेस आणि पुरेसा वेळ द्यावा अशी मीडियाकडे मागणी केली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, कपिलचा 'फिरंगी' चित्रपट बॉक्सऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. त्यामुळे कपिलची मानसिक स्थिती बिघडली.
कपिलबाबत लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे कृष्णाने समर्थन केलेले नाही. त्याने कपिलच्या या चुकीला माफ करण्याचे आवाहन केले आहे.
नैराश्याचा सामना करत असलेल्या व्यक्तीला मुद्दामून डिवचणे मूळीच योग्य नाही. कृष्णाने दिलेल्या माहितीनुसार कपिल अल्कोहलचं सेवन करतो. त्याने ट्विट करणं बंद करायला हवे. कपिल शर्माने त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोन आणि तिची बहीण निती सिमोन विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.