काँटे की टक्कर नहीं! राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया आणि क्रितीची एकमेकींसाठी पोस्ट

Alia Bhatt and Kriti Sanon: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि क्रिती सनन यांची. सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी त्या दोघींनी एकमेकींसाठी खास पोस्टही शेअर केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 25, 2023, 02:13 PM IST
काँटे की टक्कर नहीं! राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया आणि क्रितीची एकमेकींसाठी पोस्ट title=
kriti sanon and alia bhatt congratulates each other for their national award

Alia Bhatt and Kriti Sanon: सध्या राष्ट्रीय पुरस्कारांची चर्चा आहे. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिला 'गंगुबाई काठियावाडी'साठी तर क्रिती सनन हिला 'मिमी' या चित्रपटासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्या दोघींचीही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराची काल घोषणा झाली आहे. यावेळी हिंदी चित्रपटांनी तसेच दाक्षिणात्त्य चित्रपटांचीही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सोबतच मराठी चित्रपटांनीही यावेळी चांगली कामगिरी केली आहे.

2020 साली 'मिमी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर 2022 साली 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता 'मिमी' हा चित्रपट मराठी चित्रपट 'मला आई व्हायचंय!' याचा रिमेक होता. या चित्रपटातून सई ताम्हणकरांच्याही भुमिकेचे कौतुक झाले होते. त्याबरोबर 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातून कामाठीपूरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या गंगूबाईची भुमिका आलिया भट्टनं केली होती. आलियाचे या भुमिकेसाठी मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. तिला फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या पात्राला पुरस्कार कसा मिळू शकतो? म्हणून तिच्यावर टीकाही करण्यात आली होती. 

राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झाल्यानंतर आता क्रिती सनननं आलियाला आणि आलियानं क्रितीला खास मेसेजही पाठवला आहे. यावेळी दोघींनीही आपल्या मिळालेल्या पुरस्काराप्रती प्रेक्षकांचे आणि चित्रपट ज्यूरीचे आभार मानले आहेत. त्याचसोबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे ज्यात त्या दोघींनी आपल्या भावना या व्यक्त केल्या आहेत. यावेळी आलियानं क्रितीसाठी लिहिलंय की, ''ज्या दिवशी मी ‘मिमी’ चित्रपट पाहिला होता. त्या दिवशी मी तुला मेसेज केला होता. तू खूप प्रामाणिक आणि दमदार परफॉर्मन्स दिला आहेस. सिनेमा पाहून मी खूप रडले होते. खूप रडले होते. तू खूप अप्रतिम अभिनेत्री आहेस आणि या पुरस्कारास पात्र आहेस..अशीच चमकत राहा.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर क्रितीनं लिहिलंय की, ''आलिया तुझेही खूप अभिनंदन, तू या पुरस्कारासाठी पात्र आहेस. मला तुझे काम नेहमीच आवडते. हा क्षण तुझ्याबरोबर शेअर करायला मी खूप उत्सुक आहे.'' दोघींनी एकमेकींच्या प्रती लिहिलेले हे शब्द फार खास आहेत. त्यामुळे त्या दोघींचीही यावेळी जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी आलियानं आपल्या गंगुबाईच्या खास स्टाईलमध्ये पोझ दिली आहे.