सेलिब्रिटींना कॉफी पाजून Karan Johar कमवतो इतके कोटी, आकडा पाहून थक्क व्हालं

कॉफी विथ करण मनोरंजनाचं साधन असलं तरी, करणसाठी तो कोट्यावधी कमावण्याचा मार्ग, कमाईचा आकडा पाहून तुमचे डोळे विस्फारतील

Updated: Jul 11, 2022, 06:13 PM IST
सेलिब्रिटींना कॉफी पाजून Karan Johar कमवतो इतके कोटी, आकडा पाहून थक्क व्हालं title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या (karan Johar) कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनला (koffee with karan season 7) सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गज सेलेब्रिटी या सीझनला भेट देतायत. या शोमध्ये करण सेलिब्रिटींशी गप्पा मारत त्यांना निव्वळ कॉफी पाजून इतके कोटी कमवून जातो. त्याच्या या कमाईचा आकडा पाहून तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्काचं बसेल.  

कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनला (koffee with karan season 7) 7 जुलै पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये करणने दोघांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. त्यामुळे हा एपिसोड खुप गाजला होता. आता दुसऱ्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.  

येत्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, साऊथची स्टार समंथा रुथ, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत हजेरी लावणार आहेत.   

इतकी फी घेता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर हा शो होस्ट करण्यासाठी परफेक्ट आहे. त्यामुळे तो यासाठी खूप मोठी रक्कम घेतो. करण जोहर एका एपिसोडसाठी 2 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे. त्यानुसार एकूण 20-22 एपिसोडसाठी तो तो ४०-४४ कोटी रुपये कमावत आहे.