मलायका अर्जून अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याचा खास मित्र आदित्य रॉय कपूरसोबत या शोमध्ये आला होता. करणचा चॅट शो सुरु झाला आणि यात रिलेशनशिपचा उलगडा नाही झाला तर काय मज्जा.

Updated: Dec 14, 2023, 03:57 PM IST
मलायका अर्जून अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याने केला मोठा खुलासा title=

मुंबई : 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याचा खास मित्र आदित्य रॉय कपूरसोबत या शोमध्ये आला होता. करणचा चॅट शो सुरु झाला आणि यात रिलेशनशिपचा उलगडा नाही झाला तर काय मज्जा. करणसोबत झालेल्या गप्पाटप्पामध्ये अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत फ्यूचर प्लानबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे.

नेहमी खासगी प्रश्न विचारल्यावर  'नो कमेंट्स' म्हणणारे सेलिब्रिटी करण जोहरच्या शोमध्ये पोपटासारखे बोलू लागतात. करण जोहरच्या या चॅट शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अर्जून कपूर आणि आदित्य रॉय कपूरने हजेरी लावली होती. या दोघांसोबत करण जोहर त्याच्या रिलेशनशिपबद्दल खूप बोलला. शोच्या सुरुवातीला करण जोहरने अर्जून कपूरला विचारलं की, तुम्हा दोघांचं नातं (मलायका-अर्जुन कपूर)चं नातं आता दुनियेसमोर आलं आहे. तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता. मग तुम्ही तुमच्या नात्यातलं पुढंच पाऊल कधी टाकणार आहात? तुम्ही लग्न कधी करणार आहात? 

करणच्या या प्रश्नाला उत्तर देत अर्जूनने सांगितलं, मलायकाशिवाय या विषयावर बोलणं फार चुकीचं आहे. अर्जून पुढे म्हणाला, करण तुझ्या शोमध्ये येणं आणि ईमानदारीत उत्तरं देणं मला पसंत आहे. मात्र मी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार नाहीये. मलायकाशिवाय ईथे बसून आमच्या दोघांच्या फ्यूचरबद्दल बोलणं तिच्यासाठी फार चुकीचं ठरेल. अनफेअर ठरेल. जेव्हा केव्हा आम्ही तिथपर्यंत पोहचू आम्ही दोघं एकत्र याविषयी बोलू. सध्यातरी आम्ही एकमेकांसोबत खूप खुश आहोत. आत्तापर्यंत आमच्या रिलेशनशिपने अनेक अडचणींचा सामना केला आहे. तरीपण मी हेच सांगेन की, हे योग्य नाही की मी एकटा आमच्या रिलेशनविषयी बोलणं. 

याचबरोबर फ्लॉप सिनेमांबद्दल अर्जुनचं मोठं वक्तव्य
याचबरोबर करणने अर्जुन कपूरसोबत त्याच्या एकामोगोमाग एक सात सिनेमा फ्लॉप गेल्याबद्दलही चर्चा केली आहे. सुरुवातीला अर्जुनने एकापाठोपाठ एक हिट सिनेमा दिले आहेत. सुरुवातीला सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांपैकी अर्जुन एक आहे. एकेकाळी उंचीच्या शिखरावर असलेल्या अर्जूनचे सिनेमा आता मात्र फ्लॉप होत आहेत. याविषयी बोलताना अर्जून म्हणाला, हिट-फ्लॉप हा प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्याचा भाग असतो. कोणीही जाणूनबुजून असे फ्लॉप चित्रपट करत नाही, तरिही मी मरेपर्यंत अभिनय सोडणार नाही.