'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 5, 2024, 04:29 PM IST
'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक title=
(Photo Credit : Social Media)

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor : 'कॉफी विथ करण'चा सध्या 8 वा सीजन सुरु आहे. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी करणनं त्यांना त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक म्हणजे त्यांची आई श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच आयुष्य कसं होतं आणि त्यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा त्यावर या दोघींनी कशा प्रकारे रिअॅक्ट झाल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आईच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला धक्का बसला होता. या दरम्यान, खुशीनं कसं संपूर्ण घराला सांभाळलं हे देखील सांगितलं. 

जान्हवीनं करण जोहरच्या चॅटशोमध्ये याविषयी सविस्तर सांगितले. तर खुशी म्हणाली की जेव्हा तिला ही बातमी मिळाली तेव्हा तिची कशी परिस्थिती होती आणि खुशीनं कसं सांभाळालं. जान्हवीनं सांगितलं की 'मला आठवण आहे जेव्हा फोन आला होता तेव्हा मी माझ्या रुममध्ये होते. मला खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज आला. मी ओरडत आणि रडत तिच्या रुमकडे धावत गेले. पण करण मी जी गोष्ट आजपर्यंत नाही विसरली ती ही आहे की तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिनं रडणं बंद केलं. ती फक्त माझ्याजवळ बसली आणि मला सांभाळू लागली. त्यानंतर मी कधीच तिला या गोष्टीचा विचार करत रडताना पाहिलं नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीनं पुढे सांगितलं की आई आणि खुशीत एक कॉमन गोष्ट आहे. तिनं म्हटलं की 'खुशी खूप शांत स्वभावाची आहे आणि मला वाटतं की तिच्यात आणि आईत ही कॉमन गोष्ट आहे.' त्यानंतर ती रडू लागली. यावर खुशी म्हणाली की 'मला वाटलं की कुटुंबासाठी तिला स्वत:ला धीर ठेवणं गरजेच आहे. मला या सगळ्यांना सांभाळायचं आहे. कारण मला वाटतं की मी नेहमी कुटूंबात सगळ्यात स्ट्रॉंग राहिली आहे.' दरम्यान, त्यांचा हा एपिसोड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 

हेही वाचा : काजोलचं बहिणीसोबत बिनसलं; एका लिपलॉक सीनमुळं नात्यात तणाव

दरम्यान, श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत निधन झाले. एका हॉटेलच्या रुममध्ये बाथटबमध्ये डूबल्यानं त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते त्यांच्या कुटुंबातील मोहित माहवाहच्या लग्नासाठी दुबईला गेले होते.