हास्यजत्रेच्या टीममध्ये स्वप्नील जोशी, पार्थना बेहरेसह अनेक कलाकारांचा कल्ला; व्हिडीओ व्हायरल

नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. 

Updated: Jan 5, 2024, 03:50 PM IST
हास्यजत्रेच्या टीममध्ये स्वप्नील जोशी, पार्थना बेहरेसह अनेक कलाकारांचा कल्ला; व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे  हे कलाकार  या व्हिडिओत  दिसतायेत. एकंदरीतच नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी या चित्रपटामुळे मिळणार आहे.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाच्या जोरदार यशानंतर दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या या नव्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.  

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट, आयडियाज एंटरटेनमेंट, स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते  सुनील नारकर व श्री नारकर आहेत तर परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकरयांचे असून दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आधी हास्यजत्राची टीम एकत्र येवून 'एकदा येऊन तर बघा' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या  चित्रपटावर रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली होती  आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब एकत्र येवून या सुंदर सिनेमाने प्रेक्षकांना भरभरुन हसवलं. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायवल्यानंतर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित हा नवाकोरा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.