नवी दिल्ली : जगातील अनेक राजा राणी आहेत ज्यांचे जीवन रहस्यमय कथांनी भरले आहे. अशीच एक गोष्ट इजिप्तच्या राणीबाबतही आहे. राणी क्लिओपत्रा आपले सौंदर्य कायम ठेवण्यासाठी 700 गाढवीनींच्या दुधाने अंघोळ करीत असे. क्लिओपत्रा ही तत्कालीन जगातील सर्वांत सुंदर राणी होती. तसेच रहस्यमय देखील होती. तिच्या ज्ञानाचे भंडारही होते.
इजिप्तची शासक राहिलेली क्लिओपत्रा राणीच्या बाबत म्हटले जाते की, ती आपले सौंदर्य कायम ठेवण्यासाठी गाढवीनींच्या दुधाने अंघोळ करीत असे. क्लिओपत्रा इसवी पूर्व 51 ते इसवी पूर्व 30 पर्यंत इजिप्तची महाराणी होती. तेव्हाची ती सर्वात श्रीमंत आणि सुंदर महाराणी होती. तीचे नाव एतिहासात अशी व्यक्ती म्हणून नमूद आहे की, जे व्यक्तिमत्व अत्यंत रहस्यांनी भरले आहे.
क्लिओपत्रा इतकी सुंदर होती की, अनेक राजांसह सैन्य अधिकारीदेखील त्यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात फसत असत. आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात फसवून ती राजे आणि अधिकाऱ्यांकडून कामं काढून घेत असे. असं म्हटलं जातं की, राणीचे शेकडो पुरषांशी शारीरिक संबध होते. याशिवाय राणीला 5 भाषांचेही ज्ञान होते. यामुळे ती लगेचच कोणाशीही जोडली जात होती.
क्लिओपत्रा राणीचे वयाच्या 39 वर्षीच निधन झाले होते. असं म्हटलं जातं की, स्वतःला विषारी सापाचा डंक लावून तिने आत्महत्या केली होती.परंतु काही लोकं म्हणतात की, तिचे निधन मादक पदार्थांच्या सेवनाने झाली आहे.