वडिलांची छत्रछाया नसलेले कतरिना कैफचे आठ भावंड यशाच्या उच्च शिखरावर

 कतरिना कैफचे आठ भावंड यशाच्या उच्च शिखरावर...  

Updated: Nov 26, 2021, 02:36 PM IST
वडिलांची छत्रछाया नसलेले कतरिना कैफचे आठ भावंड यशाच्या उच्च शिखरावर title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कतरिनाने स्वतःचं वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. कतरिना आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या 17 वर्षांपासून कतरिना बॉलिवूडमध्ये काम करत आहे. कतरिनाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कतरिना मिळून एकून आठ भावंड आहेत. कतरिना लहाण असतानाचं तिचे आई-वडील विभक्त झाले. 

सर्वप्रथम जाणून घेवू कतरिना कैफच्या आईबद्दल तिच्या आईचं नाव Suzzane Turquotte आहे. त्या एक सोशल वर्कर आहेत. त्यांनी अनेकांना मदत केली आहे. भारतातील अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. 

कतरिनाच्या मोठ्या बहीणीचं नाव स्टेफनी आहे. सर्व भावंडांमध्ये ती सर्वात मोठी आहे. कतरिनाच्या फोटोंमध्ये स्टेफनी अनेकदा दिसली, परंतु ती कॅमेऱ्यापासून दूर राहते.  स्टेफनी तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगते. 

कतरिनाचा एकुलता एक भाऊ मायकल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो फर्निचर डिझायनिंगमध्ये पारंगत आहे. त्याचा स्वतःचा ब्लॉगही आहे. मायकेलला फिरण्याची प्रचंड आवड आहे. तो एक उत्साही आणि एक व्यावसायिक देखील आहे.

क्रिस्टीन कतरिनापेक्षा मोठी आणि सर्व भावंडांमध्ये तिसरी आहे. तो विवाहित असून गृहिणी आहे.  कतरिनाच्या भावंडांमध्ये नताशा चौथ्या क्रमांकावर आहे. नताशा ज्वेलरी डिझायनर आहे. कतरिनाने तिच्या बहिणीने डिझाइन केलेले दागिने अनेक कार्यक्रमांमध्ये घातले आहेत. 

पाचव्या क्रमांकावर कतरिना असून सहाव्या क्रमांकावर मेलिसा आहे. मेलिसाला वाचायला आणि लिहायला आवडतं. याशिवाय ती एक गणितज्ज्ञ आणि विद्वान आहे. कतरिनाची बहीण इसाबेल कैफ सातव्या क्रमांकावर आहे. इसाबेल एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. मार्च 2021 मध्ये, इसाबेलने 'टाइम टू डान्स' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

कतरिनाची सर्वात धाकटी बहीण सोनिया आहे. सोनिया फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनर आहे. कतरिना कायम तिच्या भावंडांसोबत खास क्षण व्यतीत करताना दिसते.