मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'

Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Mar 14, 2024, 03:45 PM IST
मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...' title=
(Photo Credit : Social Media)

Kirron Kher on Malaika Arora : अभिनेत्री किरण खेर या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. काही दिवसांपासून किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत किरण खेर हे मलायका अरोराला तिच्या कपड्यांवरून बोलताना दिसत आहेत. किरण खेर यांनी मलायका अरोराच्या कपड्यांवर अशी कमेंट केली की सोशल मीडियावर तो विनोद ठरला. खरंतर, किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ फार जुना आहे. त्यांचा हा व्हिडीओ कॉफी विथ करण या कार्यक्रमातील आहे. 

व्हिडीओत किरण खेर मलायका अरोराच्या ड्रेसवर कमेंट करताना दिसतात. त्या म्हणतात की पाय झाक नाही तर थंडी वाजेल. त्यानंतर पुढे त्या म्हणतात की मलायका अरोरा ही नेहमी तक्रार करत, सतत तिच्या पायांना झाकताना दिसते. त्या म्हणाल्या की, 'मलायका सतत बोलते की थंडी वाजते. दोन-दोन मिनिटांना पाय बाहेर काढताना दिसते. काही परिधान तर केलं नाही, थंडी तर वाजेल तर. काय आहे ना हिला फ्लू होईल. मग बोलते गरम पाण्याची बॉटेल द्या लवकर.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

किरण खेर यांची ही एक गोष्ट ऐकूण मलायका हसत बोलते, 'पाय आहेत तर दाखवेल ना.' सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'जर किरण खेर यांचा एखादा शो असता तर त्यांनी सेलिब्रिटींना तिथे बोलावून रोस्ट केलं असतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पंजाबी कुटुंबात असलेली ही अतिसामान्य चर्चा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मलायका गरज नसताना का हसते याचं कारण मला कळत नाही, यात हसण्यासारखं काय आहे. किरण खेर या खरंच तर बोलत आहेत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'किरण खेर या खऱ्या आई आहेत. मला त्यांच्यात असलेली ही आईची वाईब फार आवडते.' 

हेही वाचा : उर्फी जावेद अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार; चित्रपटाचं नाव आणि Release Date पाहूनच घ्या

दरम्याम, मलायका अरोराचं आयुष्य हे चांगलंच चर्चेत राहिलं आहे. काही काळापूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं तिच्या आणि अरबाज खानच्या घटस्फोटाविषयी खुलासा केला आहे. 19 वर्ष सुखी संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय आणि त्याशिवाय तिला किती पोटगी मिळाली, यावर होणाऱ्या चर्चेचेवर तिनं वक्तव्य केलं आहे.