राम रहिमला जेल झाल्यावर कीकू शारदाने असे केले सेलिब्रेट

२५ ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणी आरोपी ठरविण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी राम रहीम याला दोषी मानत १०-१० वर्षांची म्हणजे एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर कीकू शारदा याला अभिनंदनाचे मेसेज यायला लागले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 28, 2017, 08:48 PM IST
 राम रहिमला जेल झाल्यावर कीकू शारदाने असे केले सेलिब्रेट  title=

नवी दिल्ली : २५ ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणी आरोपी ठरविण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी राम रहीम याला दोषी मानत १०-१० वर्षांची म्हणजे एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर कीकू शारदा याला अभिनंदनाचे मेसेज यायला लागले. 

गुरमीत सिंगला रेप केसमध्ये आरोपी करण्यात आल्यानंतर कॉमेडियन कीकू शारदा चर्चेत आला होता. एका शोमध्ये कीकूवर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप लावण्यात आले होते. 

कीकूने कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये राम रहीमची वेशभूषा करून त्यांच्या फिल्मच्या सीनची कॉपी केली होती. यानंतर राम रहीमच्या समर्थकांनी कीकूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कीकूवर केस दाखल करण्यात आला. यात त्याला १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सोडण्यात आले होते. 

 

आतापर्यंत या प्रकरणात गप्प असलेल्या कीकू शारदाने राम रहीम याला शिक्षा झाल्यावर आपल्या पत्नी सोबत एक फोटो शेअर केला. त्यात लिहिले की, तो शांतीपूर्वक चायनीज खात आहे. 

काही दिवसांपूर्वी  ट्विंकल ख्नाने कीकूला ट्विट करून सल्ला दिला की त्याने चायनीज रेस्टॉरंटंमध्ये जाऊन नॉन एमएसजी चायनीज खायले पाहिजे.