म्हणून कपिलच्या शोचं शूटिंग पुन्हा रद्द

कपिल शर्माच्या अडचणी काही कमी घ्यायचं नाव घेत नाहीयेत. शोचं शूटिंग रद्द करण्याची नामुष्की पुन्हा एकदा कपिलवर आली आहे. 

Updated: Aug 28, 2017, 08:37 PM IST
म्हणून कपिलच्या शोचं शूटिंग पुन्हा रद्द  title=

मुंबई : कपिल शर्माच्या अडचणी काही कमी घ्यायचं नाव घेत नाहीयेत. शोचं शूटिंग रद्द करण्याची नामुष्की पुन्हा एकदा कपिलवर आली आहे. बादशाहो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण, इशा गुप्ता, इलियाना डिक्रूझ आले होते. पण हे सगळे अभिनेते कपिलची वाट पाहून निघून गेले.

हॉटेलमध्ये झोपला असल्यामुळे कपिलला शोला पोहोचता आलं नाही. स्टुडिओजवळच असलेल्या हॉटेलमध्ये कपिल आहे तो १५ मिनिटांमध्ये येईल, असं बादशाहोच्या टीमला सांगण्यात आलं. पण बराच वेळ झाल्यानंतरही कपिल आला नाही म्हणून अखेर सगळे शूटिंग न करताच परतले. या सगळ्या प्रकारानंतर आता अजय देवगन पुन्हा कपिलच्या शोमध्ये जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

शो रद्द करावा लागण्याची कपिलचीही पहिलीच वेळ नाही. याआधी जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनवेळी शाहरुख आणि अनुष्काला शूटिंग न करताच परतावं लागलं होतं. त्यावेळी कपिलची तब्येत बिघडली होती. तर टॉयलेट : एक प्रेमकथा वेळी अक्षय कुमारचं शूटिंगही होऊ शकलं नव्हतं. अर्जुन कपूर आणि अनिल कपूरलाही तसंच परतावं लागलं होतं.