शिक्षणासाठी छोट्या मुलीने मागितली अनुपम खेर यांच्याकडे भिक, म्हणाली माझं भविष्य...

अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Updated: Nov 2, 2021, 06:36 PM IST
शिक्षणासाठी छोट्या मुलीने मागितली अनुपम खेर यांच्याकडे भिक, म्हणाली माझं भविष्य... title=

मुंबई : अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या अभिनेत्याने नुकताच असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत. अनुपम खेर यांच्या या व्हिडिओवर एक मुलगी त्यांना विनवणी करत आहे आणि त्यानंतर अनुपम यांनी तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

अनुपम खेर यांना नेपाळमध्ये एक मुलगी मिळाली
अनुपम खेर नुकतेच काठमांडूला पोहोचले होते.  तिथे त्यांची भेट एका मुलीशी झाली जी भीक मागून जगते. पण इंग्रजीही खूप छान बोलते. ती मुलगी सांगतेय की, तिला शिक्षण पूर्ण करायचं आहे. पण अनुपम यांनी तिला शिकवण्याचं आश्वासनही दिलंय.

मुलीचं इंग्रजी ऐकून अनुपम थक्क झाले
हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिलंय की, 'मी काठमांडूच्या मंदिराबाहेर आरतीला या मुलीला भेटलो. ती मूळची राजस्थानची आहे. तिने माझ्याकडे काही पैसे मागितले आणि माझ्यासोबत फोटो काढण्याची मागणी केली. आणि मग ती माझ्याशी अस्खलितपणे इंग्रजीत बोलू लागली. तिची अभ्यासाची आवड पाहून मला आश्चर्य वाटलं. अनुपम खेर फाउंडेशनने तिला शिकवण्याचं आश्वासन दिलं आहे. विजयी व्हा.'

भारत सोडून नेपाळमध्ये आलेली मुलगी
या व्हिडिओमध्ये मुलगी म्हणतेय, 'माझं नाव आरती आहे आणि मी तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहे. खूप खूप धन्यवाद. मी भारतातील राजस्थानमधून आहे. तिचं हे बोलणं ऐकून अनुपम खेर यांनी तिचं कौतुक केलं आणि ती खूप चांगलं इंग्रजी बोलते असं म्हणतात. अनुपम यांनी विचारलं की तु इतकी चांगली इंग्रजी कशी बोलते?

गरिबीमुळे मागावी लागत होती भिक
आरती पुढे म्हणाली, मी भिक मागते. मी शाळेत जात नाही. मी भिक मागता- मागता इंग्लिश शिकत होते आणि आता पुर्णपणे शिकले. अनुपम यांनी विचारलं तु भिक का मागत आहेस. तुला काही चांगलं काम केलं पाहिजे.  यावर आरती म्हणाली, कारण की मी गरीब फॅमिलीमधून आहे. आणि यासाठीच मला भिक मागावी लागते. अनुपम पुढे म्हणाले, तु खुप छान इंग्लिश बोलतेस. तुला कोणी पण जॉबवर घेईल. यावर ती म्हणाली, कोणीच जॉबवर ठेवत नाही.  

शालेत पाठवण्याचं आश्वासन
अनुपम खेर तिला विचारात की, तू भारतातून इथे का आलीस? यावर आरती सांगते, भारतामध्येही अनेक अडचणी आल्या. पण इथं त्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे. अनुपम यांनी विचारलं की, तू भरतात कोणत्या शालेत गेली आहेस? यावर ती म्हणते, मी कोणत्याही शाळेत गेले नाही. आरती पुढे म्हणाली, मी कोणत्याही शाळेत गेले नाही पण मला शाळेत जाण्याची खूप ईच्छा आहे. प्लिज माझी मदत करा की मी शाळेत जावू शकीन. ती म्हणते, जर मी शाळेत गेले तर माझं नशिब बदलेल. मी अनेकदा अनेकांना सांगितलं की, शाळेत जाण्यासाठी माझी मदत करा पण कोणीच माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
यानंतर अनुपम तिच्याकडून तिचा फोन नंबर घेतात आणि तिला शाळेत जाण्यासाठी मदत करेन असं वचन देतात. अनुपम यांचे बोलणं ऐकून आरती आनंदी होते आणि म्हणते, मला माहित आहे की, जर मी शिक्षणात मेहनत घेतली तर माझं आयुष्य आणि माझं भविष्य बदलून जाईल.