'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले

Kiara Advani : कियारा आडवाणीचा कान्समधील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 12:08 PM IST
'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले title=
(Photo Credit : Social Media)

Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही नुकतीच कान्स रेड कार्पेटवर दिसली. कियाराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सगळीकडे चर्चा ही कियाराच्या स्टाईलची नाही तर तिच्या एका व्हिडीओची आहे. कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कियारानं रेड कार्पेटवरून आल्यानंतर ती मीडियाशी बोलतान दिसली. त्यावेळी तिनं ज्या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर दिलं ते अनेकांना पटलेलं नाही. त्याचं कारणं तिनं अ‍ॅक्सेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कियाराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या निमित्तानं रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि वॅनिटी फेयर यूरोपच्या डिनरमध्ये 6 महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यापैकी एक नाव हे कियारा आडवाणीचं होतं. रेड कार्पेटवर आल्यानंतर कियारा आडवाणीनं येणाचा आनंद आणि उत्साह शेअर केला. याविषयी बोलताना कियारा म्हणाली 'हे खूप चांगलं आहे. आता माझ्या करिअरला एक दशक पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. मी पहिल्यांदा कान्समध्ये येऊन आणि चित्रपटात मी महिलांसाठी रेड सी फाऊंडेटशनकडून सन्मानित होण्यावर आभार व्यक्त केले आहे.'

दरम्यान, कियारा आडवाणीच्या इंग्रजी बोलतानाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी कियारावर कमेंट केल्या की ती स्वत: ला खोटं दाखवते. एक नेटकरी म्हणाला, 'मला ती खूप आवडते पण असं का बोलली?' दुसरा नेटकरी म्हणाला की 'भारतीय टोनमध्ये बोलणं चुकीचं किंवा अपमान वाटेल असं नाही. मग हे लोक त्याच टोनमध्ये का बोलत नाही आणि सगळ्या गोष्टी खराब करतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिनं भारतीय टोनमध्ये बोलायला हवं होतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'वुमेन इन सिनेमा गाला' कान्स फिल्म फेस्टिवलच्या अनेक हाय प्रोफाइल कार्यक्रमांपैकी एक आहे. दरवर्षी येणाऱ्या या कार्यक्रमात टॅलेंट्सला एकत्र घेण्यात येतो. या वर्षी अनेक भारतीय सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसले. 

कियारानं या कार्यक्रमात गुलाबी आणि काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर कियारानं शेअर केले ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत कियारानं कॅप्शन दिलं की 'ही रात्र आठवणीत राहिल.'