'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

KGF स्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. KGF-2 नंतर यश आणखी एक उत्तम अॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 28, 2024, 06:37 PM IST
'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स title=

Toxic : साऊथचा सुपरस्टार यश KGF-2 नंतर पुन्हा एकदा आणखी एक नवीन अॅक्शन थ्रिलर चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. यशच्या आगामी चित्रपटाचे नाव 'टॅाक्सिक' असून या चित्रपटात साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशीही दिसणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटात करीना कपूर यशसोबत दिसणार होती. मात्र, आता करीना कपूरची जागा कियाराने घेतली असून तिने या चित्रपटात आपले स्थान निर्माण केलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार कियारा अडवाणी आणि सुपरस्टार यश यांची जोडी होणार आहे. तर अभिनेत्री नयनतारा ही यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारासह ताराही यशसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

'टॉक्सिक' अॅक्शन थ्रिलर

'टॉक्सिक' हा दक्षिणेकडील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात अनेक कथा आहेत. ज्या कथा पाहून प्रेक्षकांना देखील आनंद होणार आहे. क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्ससोबतच चित्रपटात एक अनटोल्ड लव्हस्टोरी देखील आहे. त्यामुळे 'टॉक्सिक' चित्रपटात यश हा दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. ज्यामध्ये तारा सुतारिया आणि कियारा अडवाणी असणार आहेत. नयनतारा यशच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. तर हुमा कुरेशी ही नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 

चित्रपटात बजेट

'टॉक्सिक' चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाला उत्तम बनवण्यासाठी निर्माते कसलीही कसर सोडणार नाहीत. कारण या बिग बजेट चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांची दमदार उपस्थिती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत जरी असला तरी त्याच्या खांद्यावर बरीच जबाबदारी असणार आहे. स्त्री पात्रे अतिशय बारकाईने मांडण्यात येणार आहेत. 'टॉक्सिक' च्या कथेनुसार यश हा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'टॉक्सिक' कधी प्रदर्शित होणार? 

यशचा हा आगामी चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी 200 दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, 'टॉक्सिक' चित्रपटाचे भारतात 150 दिवस शूटिंग चालणार आहे. तर चित्रपटातील काही भागांचे शूटिंग हे लंडनमध्ये होणार आहे. यशचा आगामी चित्रपट हा गीतू मोहनदास दिग्दर्शित करत आहेत. 'टॉक्सिक' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.