'या' खास व्यक्तीमुळे सिद्धार्थ - किआराच्या नात्यातील दुरावा नष्ट

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी खास व्यक्ती हवीच..., जिच्यामुळे सिद्धार्थ - किआराच्या नात्यातील दुरावा झाला नष्ट   

Updated: Jun 11, 2022, 10:34 AM IST
'या' खास व्यक्तीमुळे सिद्धार्थ - किआराच्या नात्यातील दुरावा नष्ट  title=

मुंबई : प्रत्येक नात्यात चढ-उतार येत असतात. प्रेमात देखील असे प्रसंग अनेकदा येतात. नात्यात होणाऱ्या वादांमुळे अनेक जण विभक्त होण्याचा निर्णय घेतात. प्रेमात अनेक जोडप्यांचं ब्रेकअप देखील होतं. पण आपल्या आजू-बाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना वाटत असतं, की या दोघांनी विभक्त होऊ नये. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा आडवाणीच्या आयुष्यात देखील अशी एक खास व्यक्ती आहे.  

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारणही समोर आले नाही. पण काही दिवसांपूर्वी किआरा आणि सिद्धार्थ पुन्हा एकत्र आल्याचं कळत आहे. 

खास व्यक्तीमुळे किआरा - सिद्धार्थ पुन्हा एकत्र 
बॉलीवूडलाइफनुसार,  किआरा - सिद्धार्थचं पॅचअप इतर कोणी नाही, तर दिग्दर्शक करण जोहरने केलं आहे. जेव्हा करण जोहरला दोघांच्या ब्रेकअपची माहिती मिळाली तेव्हा करण जोहरने दोघांमध्ये सर्वकाही ठीक करण्याचे आश्वासन दिले. आता दोघे पुन्हा एकत्र आल्याचं कळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून किआरा आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहे. 'शेहशाहा' सिनेमातून  त्यांच्यातील नात्याचा गोडवा वाढला. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. आता ब्रेकअपच्या चर्चांनंतर किआरा आणि सिद्धार्थ पुन्हा एकत्र आले आहेत.