Kiara Siddharth Break-up : बॉलीवूडमधील जोडपी ही सर्वाधिक चर्चेत राहतात. दीपिका-रणवीर असो वा रणबीर-आलिया, प्रत्येक जोडप्यांची चर्चा ही आजकाल समाजमाध्यमांवरून वेगाने पसरत असते. त्यातीलच एक जोडी आहे ती म्हणजे कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राची. मागच्या वर्षी या दोघांचा शेहर्शहा हा चित्रपट ओटीटीवर रिलिज झाला होता. त्यांच्या चित्रपटाचे खूप कौतुकही झाले होते. या चित्रपटाच्याच दरम्यान हे दोघं एकमेकांसोबत डेटिंग करत असल्याच्याही भरपूर चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे कुठेही एकत्र पार्टीमध्ये, वेकेशनला अथवा लग्नसभारंभांना दोघेही कित्येकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
मध्यतंरी त्यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ते दोघं एकत्र नाहीत असा समज त्यांच्या चाहत्यांचा झाला होता. परंतु हे फारसे खरे नसून ते दोघं आता नुकतेच दुबईला कियारा अडवानीच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त स्पॉट झाले होते. त्यांच्या फॅन्सनीच त्यांच्यासोबत सेल्फीचे फोटो काढले आहेत. जे आता प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघेही दुबईमध्ये आपला चांगला वेळ घालता दिसत आहेत. त्याचबरोबर ते एकत्र आपल्या फॅन्ससोबतही वेळ घालवताना दिसत आहेत. कियारा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेली आहे त्याच्यापाठापोठ सिद्धार्थ मल्होत्राही तिच्यासोबत दुबईला पोहचला आहे. या दोघांचे हे एकत्रित रोमॅण्टिक क्षण पाहून सगळेच खूश झाले. पण त्याचसोबत त्यांच्या अशा या परत मिलनामुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे की नाही, यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये आता जोरात चर्चा होऊ लागली आहे.
ते दोघं एकत्र दिसले याचा अर्थ ते आपल्या ब्रेकअपचा बहाणा करत आहेत की काय , अशी कुजबूज त्यांच्या चाहत्यांमध्ये होऊ लागली आहे आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे.
कियारा आणि सिद्धार्थ शेवटचे एकत्र शहर्शहा या चित्रपटातून एकत्र दिसले होते. आता लवकरच ते दोघं कुठल्याही आगामी चित्रपटातून दिसणार आहेत का याबद्दल त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.