Kim Kardashian: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन यांनी हजेरी लावली होती. इतर देशातील पाहुण्यांप्रमाणेच दोन्ही बहिणीही पूर्णपणे भारतीय लुकमधील कपडे परिधान केले होते. सोशल मीडियावर त्यांनी त्याचे अंनत अंबानी यांच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
ख्लोने तिच्या स्नॅपचॅट स्टोरीमध्ये तिचा लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे. मात्र, तिचे हे कॅप्शन भारतीयांना अजिबात आवडले नाही.
स्नॅपचॅट स्टोरीमध्ये नेमकं काय?
स्नॅपचॅट स्टोरीवरील व्हिडिओमध्ये ख्लोने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. त्यामध्ये तिने अनेक फोटो देखील काढले आणि स्नॅपचॅट स्टोरीला ठेवले. त्या स्टोरी ठेवताना तिने त्याला कॅप्शन देखील दिलं होत. ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, 'मित्रांनो, माझे कपडे खूप सुंदर आहेत, मी जे परिधान केले आहे ते एका स्थानिक डिझायनरने खूप सुंदर डिझाइन केलेले आहे. मी तुम्हाला त्याचे नाव सांगेन. सर्व काही छान आहे. मला हा गुलाबी रंग खरोखरच आवडतो. असं म्हणतं तिने अनंत-राधिकाच्या लग्नातील खास फोटो शेअर केलाय.
प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा
ख्लोची ही पोस्ट तिच्या टीमच्या लक्षात आल्यानंतर तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये सांगितले की ते जगातील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले होते.
लोक का भडकले?
ख्लोच्या पोस्टवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले- ख्लो कार्दशियनने मनीष मल्होत्राला लोकल डिझाइनबद्दल सांगितले का? दुसरा म्हणाला, 'ख्लो म्हणत आहे की अंबानीच्या लग्नासाठी तिचा लेहेंगा एका स्थानिक डिझायनरने बनवला होता. एका युजरने संताप व्यक्त करताना म्हटलं आहे की, यामुळेच हे लोक एका लग्नात हजेरी लावून मिळालेल्या प्रसिद्धीच्याही लायकीचे नाहीत.