'त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्...', हास्यजत्रेतील 'या' कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

Kedar Shinde Special Post for Arun Kadam : केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या सगळ्यात त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील एका अभिनेत्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्या दोघांमधील मैत्रीचं नात दाखवलं आहे.  

दिक्षा पाटील | Updated: May 8, 2023, 01:58 PM IST
'त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्...', हास्यजत्रेतील 'या' कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Kedar Shinde Special Post for Arun Kadam : 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक  थिएटरमध्ये तुफान गर्दी करत होते. तर चित्रपट पाहून आल्यावर अनेकांनी असे सांगितले की आम्ही चक्क शाहीर साबळे यांना पाहिले असं म्हटलं. चित्रपट केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्यावर आधारीत आहे. चित्रपटातं थोडक्यात शाहीर साबळे यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. केदार शिंदे यांचं सगळीकडे कौतुक होत असताना त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोच्या एका कलाकारासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

केदार शिंदे यांनी महाराष्ट्र हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील अभिनेता आणि विनोदवीर अरुण कदम यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत केदार शिंदे आणि अरुण कदम शेजारी उभू असून त्यांच्या शेजारी अंकुश चौधरी, सना शिंदे आणि केदार शिंदे यांच्या पत्नी देखील आहेत. हा फोटो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवरचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा फोटो शेअर करत केदार शिंदे कॅप्शनमध्ये म्हणाले, 'बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी, म्हणजे सर्वांचा अरुणविषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेलो होतो. त्या वेळचा हा खास फोटो. अरुण आणि माझी मैत्री 1990 पासूनची आहे. माझ्या अनंत सुखदुःखांत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरुणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरुणच. कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढल्या आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे.'

हेही वाचा : धमाकेदार! The Kerala Story चित्रपटानं तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

पुढे केदार शिंदे म्हणाले, 'आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामधे सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच उर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण.' केदार शिंदे यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.