KBC 16 Question Related To Mahabharat : नेहमीच चर्चेत असणारा 'कौन बनेगा करोडपति' या कार्यक्रमाच्या नव्या सीझनची सुरुवात झाली आहे. नेहमी प्रमाणेच अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा हा शो होस्ट करताना दिसत आहेत. तर यावेळी या क्वीझ शोमध्ये काही नवीन नियम आणले आहेत. ज्यात स्पर्धकानं जिंकलेली रक्कम ही दुप्पट होऊ शकते. या कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये गुजरातच्या उत्कर्ष बख्शी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसले होते. त्यानंतर जेव्हा गेम सुरु झाला. तेव्हा अमिताभ यांनी काही गोष्टींवर चर्चा केली तर त्यानंतर 12 प्रश्नापर्यंत उत्कर्ष यांनी अचूक उत्तर दिलं. पण 13 प्रश्नावर येऊन ते अडखळले. चला तर तो कोणता प्रश्न होता आणि त्याचं नेमकं उत्तर काय आहे हे जाणून घेऊया...
या प्रश्नावर उत्कर्ष बख्शी यांनी दुग्रास्त्रचा वापर केला आणि जिंकलेल्या रक्कमेला त्यांनी दुप्पट केलं. पण 13 प्रश्नावर ते जाऊन अडकले. खरंतर शोमध्ये असलेल्या संदूक आणि दुग्रास्त्रची कॉम्सेप्ट अॅड करण्यात आली आहे. सुपर संदूकची लाईफ लाईन वापरून उत्तर दिलं आणि ते योग्य असेल तर तिथे असलेल्या स्पर्धकाला दुप्पट रक्कम मिळते. या लाईफ लाईनचा वापर ते सहाव्या आणि दहाव्या प्रश्ना दरम्यान वापरू शकतात. उत्कर्षनं 10 व्या प्रश्नावर दुग्रास्त्रचा वापर केला आणि रक्कम दुप्पट केली. असं केल्यानं तो 12 प्रश्नांचं योग्य उत्तर दिलं. 13 वा प्रश्न हा महाभारताशी संबंधीत होता. दोन लाइफलाइन वापरल्यानंतर ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही.
अमिताभ बच्चननं उत्कर्ष बख्शी यांना प्रश्न विचारण्यात आला की महाभारानुसार, कोणत्या देवानं अंबाला एक माळ भेट केली होती आणि म्हटलं होतं की जो ही माळ घालेल तो भीष्मचा अंत करेल?
या प्रश्नासाठी उत्कर्षनं दोन लाइफलाइनचा वापर केला पण तरी देखील त्याचं अचूक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला फक्त 3.20 लाख रुपये घेऊन घरी जावं लागलं.
या प्रश्नाचं योग्य उत्तर हे भगवान कार्तिकेय आहे. जर या प्रश्नाच उत्तर उत्कर्ष यांनी दिलं असत तर त्यानं 25 लाख रुपये रक्कम जिंकली असती.