कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने सोडलं मौन

विवाहाच्या रंगणाऱ्या चर्चांबद्दल काय म्हणाली अभिनेत्री कतरिना कैफ?   

Updated: Oct 28, 2021, 09:37 AM IST
कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने सोडलं मौन  title=

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कौफ विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे. पण दोघे स्टार खरंच लग्न करणार की नाही याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. जेव्हापासून दोघे लग्न करणार अशा चर्चा रंगत आहेत, तेव्हापासून त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या कपड्यांची जबाबदारी कोणाकडे आहे, हे देखील समोर आलं आहे. विकी-कतरिनाच्या लग्नाचं ठिकाण देखील ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. 

एका रिपोर्टनुसार, दोघांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. दोघांचे वेडिंग आउटफिट्स डिजाइनर सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. यापूर्वी सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा ड्रेसही डिझाइन केला होता. या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघंही लग्न करू शकतात असं बोललं जात आहे. पण आता खुद्द कतरिनाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

 'या' कारणासाठी Katrina Kaif देणार Vicky Kaushal ची साथ

Bollywoodlife.com ला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सत्य सांगितलं आहे. लग्नाच्या अफवांबद्दल कतरिना म्हणाली, 'हा असा एक प्रश्न आहे जो मला गेल्या 15 वर्षांपासून विचारला जात आहे...' शिवाय सूत्रांच्या माहितीनुसार, 'विकी-कतरिनाच्या लग्नाच्या फक्त अफवा आहेत. दोघांची काही योजना नाही... कतरिना आणि विकीच्या लग्नाबद्दल अफवा आता ट्रेंड झालं आहे... '

दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर कतरिना लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, विकी लवकरच सॅम बहादूर आणि द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटात दिसणार आहे.