अभिनेत्याच्या वाईट कृत्यामुळे सलमानसमोर ढसा-ढसा रडू लागली कतरिना

अभिनेत्याच्या अशा वागणुकीनंतर सलमान आला कतरिनाच्या मदतीला धावून...  

Updated: Nov 26, 2021, 05:31 PM IST
अभिनेत्याच्या वाईट कृत्यामुळे सलमानसमोर ढसा-ढसा रडू लागली कतरिना title=

मुंबई :  बॉलिवूडमध्ये करियर घडवत असताना प्रत्येक कलाकाराला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अभिनेत्री कतरिना कैफने देखील अशा अनेक वाईट संकटांचा सामना केला आहे. त्यापैकी एक म्हणजे जेव्हा अभिनेता जॉन अब्राहमने सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हा कतरिनाला असं वाटलं की तिचं करियर आता संपेल. अशा वेळी तिच्या मदतीला धावून आला अभिनेता आणि अनेकांचा गॉडफादर सलमानन खान. सलमान कतरिनाला म्हणाला,  'तू आता रडत आहेस, पण पुढे जावून हा दिवस आठवला की तू पोट धरून हसशील...'

जॉन अब्राहमने करतरिनाला 'साया' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. कतरिनाला बायबाय करून त्याने तिच्या जागी अभिनेत्री तारा शर्माची निवड केली.  या घटनेनंतर कतरिनाला प्रचंड वाईट वाटलं होतं. एका मुलाखतीत सलमानने यावर खुलासा केला.

...म्हणून जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली

सलमान म्हणाला, 'कतरिना म्हणत होती माझं करियर संपलं. तेव्हा मला असं वाटलं ही पुढे जाऊन मोठी अभिनेत्री होणार मग आता का रडते. तेव्हा मी तिला म्हणालो तू आता रडत आहेस, पण पुढे जावून हा दिवस आठवला की तू पोट धरून हसशील... ' अखेर सलमानचं म्हणणं खरं झालं. आज कतरिना प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

त्यानंतर कतरिना आणि जॉन 'न्यूयॉर्क’ चित्रपटात एकत्र झळकले होते. चित्रपटात जॉन असल्यामुळे कतरिना नाराज होती. तेव्हा कतरिना सलमानकडे गेली आणि म्हणाली सिनेमात जॉन आहे.  तेव्हा मी तिला म्हणालो, 'तू फक्त सिनेमाची कथा आणि डायरेक्टरवर लक्ष दे.. सह कलाकार तर कुणीही असू शकतो. आता तू अशा जागी आहेस की तू जॉनला काढू शकतेस. पण ते योग्य नाही.' अशाप्रकारे सलमानने  कतरिनाची समज घातली.