मुंबई : मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल ही सेलिब्रिटी जोडी मायदेशी परतली. सुट्टीदरम्यानचे बरेच फोटो त्या दोघांनीही चाहत्यांच्या भेटीला आणले. यामध्ये त्यांच्यातील काही खास क्षणांचीही झलक पाहायला मिळाली. (Katrina Kaif Vicky Kaushal ranbir kapoor )
कतरिना आणि विकीच्या नात्याची एक वेगळी बाजू सर्वांनीच पाहिली. जिथं पत्नीच्या वाढदिवसासाठी या अभिनेत्यानं केलेल्या दमदार आयोजनानं अनेकजण भारावले. पण, आता म्हणे लग्नानंतर काही महिन्यांतच या जोडीच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आहे.
निमित्त ठरतोय तो म्हणजे कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड, रणबीर कपूर. सूत्रांच्या माहितीनुसार विकी येत्या काळात 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता म्हणे या चित्रपटामध्ये रणबीरचीही एक लहानशी भूमिका असेल. पण, कतरिनाला मात्र हे रुचलेलं नाही.
निर्मात्यांनी रणबीरला विकीच्या चित्रपटात समाविष्ट करण्याची बाब तिला मुळीच पटलेली नाही. या साऱ्या परिस्थितीमध्ये आता ही वादाची ठिणगी विझवण्याचा प्रयत्न विकी कौशल करत असल्याचं म्हटलं जात आहे.
कतरिनाचा राग दूर करत तो या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करण्यावर अधिक भर देणार आहे. त्यामुळं आता त्याच्या अभिनयानं तरी कतरिनाचा राग शांत होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कतरिनाच्या संपाताला अधिकृत दुजोरा अद्यापही मिळू शकलेला नाही. पण, विकी आणि रणबीर या चित्रपटात एकत्र आल्यास त्यांच्या कारकिर्दीत ते दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यापूर्वी 'संजू' या चित्रपटामध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.