मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकामागून एक अभिनेत्री गुडन्यूज शेअर करत आहेत. अलीकडेच सोनम कपूरपासून ते आलिया भट्टपर्यंत सर्वांनी तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, आता कतरिना कैफबद्दल अनेक अटकळ बांधल्या जात आहेत. हे आम्ही नाही तर कतरिना कैफचे लाखो चाहते म्हणत आहेत. ती आई होणार असल्याचा अंदाज तिचे चाहते बांधत आहेत.
अलीकडेच, ई-टाइम्सने इंस्टाग्रामवर लोकांना विचारलं की कतरिना कैफ लाइमलाइटपासून का दूर आहे? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या प्रश्नावर, बहुतेक चाहत्यांनी अभिनेत्री गर्भवती असल्याचा अंदाज लावला. कतरिना कैफ बरेच दिवस सार्वजनिक ठिकाणीही दिसली नाही. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीतही तिने हजेरी लावली नाही किंवा इतर कोणत्याही पार्टीत ती दिसली नाही.
इतकंच नाही तर यावेळी कतरिनाने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. ३८ वर्षीय कतरिना कैफ प्रेग्नंट आहे आणि त्यामुळेच ती लाइमलाइटपासून दूर आहे. असा अंदाज सोशल मीडियावर चाहते बांधत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ 16 जुलैला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर करू शकते.
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी विकी कौशलसोबत लग्न केलं होतं. या जोडप्याचं राजस्थानमध्ये ग्रॅण्ड वेडिंग पार पडलं. यामध्ये कैफ आणि कौशल कुटुंब सामील झालं होतं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.
कामाच्या आघाडीवर, कतरिना कैफ शेवटची अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी चित्रपटात दिसली होती. आता तिचा फोन भूत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा'मध्ये ती प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.