प्रेग्नंसीच्या बातम्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केली 'गुडन्यूज'

हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. 

Updated: Jan 23, 2023, 02:11 PM IST
प्रेग्नंसीच्या बातम्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केली 'गुडन्यूज' title=

मुंबई : रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि बिपाशा बासू-करण सिंग ग्रोव्हरचे पालक बनल्यानंतर कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरातही गुडन्यूज आहे अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होती. आणि चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे, अलीकडेच कतरिना कैफच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या सेटवरून कतरिना कैफचे अनेक फोटो समोर आले होते. या फोटोमध्ये कतरिना कैफ तिचा बेबी बंप फ्लॉंट करतानाचा एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत होता. पण कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का? की, ही नुसती अफवा आहे हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. चाहते या जोडीला खूप पसंती देत असतात. प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान कतरिना कैफने इंस्टाग्रामवर आपल्या फँन्ससोबत गुडन्यूज शेअर केली आहे. हे फोटो शेअर करताच अभिनेत्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान कतरिनाने शेअर केली 'गुडन्यूज'!
आम्ही तुम्हाला सांगतो की, कतरिना कैफ इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. काही वेळापूर्वी, कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने हा नवीन फोटो पोस्ट करून एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे, ज्यावर तिचे चाहते तिचं मनापासून अभिनंदन करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिनाच्या या गुड न्यूजबद्दल चाहत्यांकडून तिचं अभिनंदन होत आहे
सध्या सगळीकडे कतरिनाच्या प्रेग्नेंसीची चर्चा जोरदार सुरू आहे आणि या बातम्यांमध्ये अभिनेत्रीची 'गुडन्यूज' संबंधित पोस्टही व्हायरल होत आहे. मात्र ही पोस्ट तिच्या प्रेग्नंसीची नसून अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट तिने इंस्टाग्रामवर 70 मिलीयन फॉलोअर्स पूर्ण केले असल्याची आहे. ही 'गुडन्यूज' शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत की त्यांनी कतरिनाला नेहमीच पाठिंबा दिला आहे.