हे काय करून बसली कतरीना..चाहत्यांना मोठा धक्का

सध्या कॅटरिना कैफ फोनभूत च प्रमोशन (katrina kaif phonebhoot prompotion) करण्यात बिझी आहे.

Updated: Nov 1, 2022, 06:05 PM IST
हे काय करून बसली कतरीना..चाहत्यांना मोठा धक्का  title=

katrina kaif phonebhoot change face:  बॉलीवूड (bollywood) हे ग्लॅमरच (bollywood glamour) विश्व आहे. या क्षेत्रात कलाकारांवरती कायमच स्पॉट लाईट (spot light) असतात.

त्यांच्या चेहऱ्याला मेकअप (makeup) आणि टचअपची सातत्यानं गरज भासते. कॅमऱ्याभोवतीच स्वतःला प्रेझेटं करावं लागत असल्यामुळे हे सेलिब्रेटी आपल्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे प्रयोग करताना दिसतात.

आताही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्याच अभिनेत्रींची ज्यांनी आपल्या नैसर्गिक सौंदर्याला नाकारून चेहऱ्याची प्लॅटिक सर्जरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला चेहरा फुलवण्यासाठी या अभिनेत्रींनी साधीसोप्पी नाही तर महागातील महाग सर्जरी करून घेतली आहे. (top bollywood actresses did plastic surgery)

या नावांमध्ये प्रियंका चोप्रापासून जान्हवी कपूरपर्यंत अभिनेत्रींचा समावेश आहे. कधी तिरक नाक तर कधी ओठं अशा चेहऱ्यावरील भागांना पुर्णपणे बदलण्याचा हट्टहास अभिनेत्रींनी केला आहे. (plastic surgery done by actress) 

पण आता प्लास्टिक सर्जरीविषयी बोलण्याचं कारण आहे कतरीना कैफ..हो सध्या कॅटरिना कैफ फोनभूत च प्रमोशन (katrina kaif phonebhoot prompotion) करण्यात बिझी आहे.

प्रमोशन दरम्यान तिचे लुक सध्या खूप फेमस होत आहेत. आणि त्याची चर्चा सुद्धा होतेय. सोशल मीडियावर कतरिनाच्या बदलेल्या लूकवर लोक अनेक कॉमेंट्स करू लागले आहेत. 

तिनं प्लॅस्टिक सर्जरी केली की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याला कारण म्हणजे तिचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये कतरिनाचा वेगळाच लूक समोर आल्याचं दिसून आले आहे.

चांगल्या चेहऱ्याची वाट लावून घेतलीस..अशा प्रतिक्रिया आता कतरिनाला मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आता कतरिनानं खरचं प्लॅस्टिक सर्जरी केली की काय असा सवाल नेटकरी विचारु लागले आहेत.

नुकताच एक व्हिडीओ समोर सुद्धा आला ज्यात ती फोटोशूट करतेय आणि त्याच डिरेक्शन तिचा पती विकी कौशल करताना दिसत आहे. आता काय खार आणि काय खोत हे कतरीनालाच माहित.. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)