'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील कॅटरीनाचाही लूक झाला लीक

ठग्स ऑफ हिंदोस्तान या आगामी चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता अधिक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही सीन्सचे फोटो सोशलमीडियामध्ये लीक झाले होते.  

Updated: Feb 8, 2018, 05:20 PM IST
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील कॅटरीनाचाही लूक झाला लीक title=

मुंबई : ठग्स ऑफ हिंदोस्तान या आगामी चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता अधिक आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही सीन्सचे फोटो सोशलमीडियामध्ये लीक झाले होते.  

कॅटरीना कैफ खास भूमिकेत  

ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये आमीर आणि बीग बींसोबत कॅटरिना कैफदेखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉगवर थिरकताना कॅटरिनाचे काही फोटो सोशल मीडियामध्ये शेअर झाले आहेत. 

 

Thugs of the hindostsan dance song #thugsofhindostan

A post shared by katrina kaif street style (@katrinakaif_streetstyle) on

 

डान्स प्रॅक्टिस करताना कॅटरिना  

कॅटरिनासोबत कोरिओग्राफर प्रभू देवादेखील झळकणार आहे. सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये कॅटरिना थिरकताना दिसत आहे. चित्रपटाचा बराचसा भाग पूर्ण झाला आहे.  
कॅटरिनाने काही दिवसांपूर्वी मिड एअर डान्स मूव्ह प्रॅक्टिस करतानाचे काही फोटो,व्हिडिओ शेअर केले आहेत.