ऐश्वर्यानंतर कतरिनाच्या Airport Look नं चाहते हैराण; ट्रोल करत म्हणाले...

Katrina Kaif Airport Look: फॅशन ही आता मोठ्या प्रमाणात बदलते आहे. सेलिब्रेटींमध्येही फॅशन मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आता वेस्टर्न कल्चरनं पुर्णपणे कब्जा घेतला आहे. त्यातून सेलिब्रेटींच्या (Katrina Kaif News) वेगवेगळ्या लुक्सची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतीच कतरिना कैफ ही एअरपोर्टवर (Viral News) स्पॉट झाली आहे. यावेळी तिनं कॅरी केलेला लुक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: May 19, 2023, 07:00 PM IST
ऐश्वर्यानंतर कतरिनाच्या Airport Look नं चाहते हैराण; ट्रोल करत म्हणाले... title=
(Photo : Viral Bhayani | Instagram)

Katrina Kaif Spotted at Airport: अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली (Katrina Kaif News) जाते. जीम लुक असो, एअरपोर्ट लुक असो वा कुठल्या मोठ्या इव्हेंटचा लुक असो. कतरिना प्रत्येक लुकमध्ये खुलून दिसते. सध्या तिचा एअरपोर्टलुक सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे. मध्यंतरी तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. यावेळी तिचा लुकपाहून चाहते हैराण झाले आहेत. काही दिवसांपुर्वी ऐश्वर्याच्या लुकमुळे ती ट्रोल झाली होती. आता कतरिना आपल्या एअरपोर्ट (Katrina Kaif Airport News) लुकमुळे ट्रोल झाली आहे. यावेळी कतरिनानं हटके वेस्टर्न स्टाईल सूट घातला होता परंतु त्यावर तिनं घातलेला जॅकेट मात्र नेटकऱ्यांना आवडला नाही. (katrina kaif gets trolled on wearing jacket with weird style entertainment viral news)

हल्ली फॅशन ही खूप मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते आहे. फॅशनला एक वेगळाच स्वॅग निर्माण झाला आहे. फॅशनसोबत अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं लोकं खेळताना दिसतात. या व्हिडीओमध्ये कतरिनाचंही काहीचं असंच झालं आहे. आपल्या सूटवरती तिनं जॅकेट तर घातला होता परंतु तो अर्धवटचं घातला होता, म्हणजे घातला नव्हताच फक्त आपल्या दंडांपर्यंत ठेवला होता. हे पाहून तिला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. एका नेटकऱ्यानं म्हटलंय की, ''अरे मॅडम जर जॅकेट घालायचा नाहीये तर काढून टाका ना.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''अरे जॅकेट तरी घाला असा पडात काय जाता आहात'', तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''ही कसली फॅशन आहे?'' 

हेही वाचा - Cannes मध्ये हरियाणी डान्सर सपना चौधरीला पाहून नेटकऱ्यांना धक्का; म्हणाले, ''टॅक्सीतून आलीस का?''

वर म्हटल्याप्रमाणे, कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना कोण उधाण आले होते. त्यातून आता पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या तिच्या या व्हिडीओखालीही चाहते नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. काही नेटकऱ्यांनी कतरिना पुन्हा प्रेग्नंट (Katrina Kaif Pregnant News) असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपुर्वीच विकी कौशलनं आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्यांनी एकत्र एकमेकांसोबत वेळ घालवला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 2021 च्या डिसेंबर महिन्यात गुपचूप लग्न केले. आपल्या लग्नाचा काहीच थांगपत्तानं देता त्यांनी आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून दिली. 9 डिसेंबर 2021 ला त्या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला वर्षपुर्तीही झाली आहे. कतरिनाचा आगामी 'जी ले जारा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.