साखरपुड्याच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा कतरिना आणि विकी कौशल एकत्र

बॉलिवूडमध्ये गेल्या काहीदिवसांपासून विक्की कौशल आणि कतरिा कैफच्या अफेअरच्या चर्चा जोरदार सुरुयेत.

Updated: Oct 11, 2021, 03:55 PM IST
साखरपुड्याच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा कतरिना आणि विकी कौशल एकत्र title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काहीदिवसांपासून विक्की कौशल आणि कतरिा कैफच्या अफेअरच्या चर्चा जोरदार सुरुये. पण दोघांपैकी कोणीही या नात्याचा अद्याप खुलासा केलेला नाही. अफेअरच्या चर्चानंतर कतरिना आणि विक्की कौशलसोबत त्याच्या सिनेमाच्या स्क्रिनींगला पोहचली. दोघांना यावेळी एकसारख्या घातलेल्या कपड्यांमध्ये स्पाट करण्यात आलं.

ओटीटी वर रिलीज होणार 'सरदार उधम'
विकी कौशलचा हा चित्रपट या महिन्याच्या 16 तारखेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चित्रपट रिलीज होण्याआधी सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. ज्या स्क्रिनींगला विकी आणि कतरिना दिसत आहेत. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये विकी पांढरा शर्ट आणि कतरिना पांढरा टी-शर्ट परिधान करताना दिसत आहे. विकीने या दरम्यान पापाराझीसाठी पोजही दिल्या आहेत.

विकी 'साम बहादूर'मध्येही दिसणार आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलताना, सरदार उधम व्यतिरिक्त, विकी कौशल लवकरच साम बहादूरमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर त्यांचा सरदार उधम हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे कतरिना 
कतरिनाबद्दल बोलायचं झालं तर तिचा अक्षय कुमारसोबतचा सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासोबत ती सलमान खानच्या टायगर 3 मध्ये दिसणार आहे. याशिवाय, फोन भुथ आणि जी ले जरा हे सिनेमा देखील तिच्या पाइपलाइनमध्ये आहेत.