मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट आणि मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री काजल अग्रवाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे.
काजल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
खरंतर, यावेळी काजल तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. जरी अभिनेत्रीने अद्याप याची घोषणा केली नसली. तरी काजलने तिचा प्रियकर गौतम किचलू सोबत 2020 मध्ये लग्न केलं. आता काजलच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. ज्याबद्दल अभिनेत्रीचा पती गौतमने स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली आहे.
यासोबतच एक ट्विट पण देखील केलं आहे. काजल आणि गौतमच्या घरी आलेला छोटा सदस्य हा पाळीव कुत्रा आहे. ज्याचं नाव त्यांनी मिया ठेवलं आहे. अभिनेत्रीने मियाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या कुटुंबातील या सदस्याच्या आगमनाची माहिती दिली आहे. दोघांनी आपल्या बेबी डॉगचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.फोटो शेअर करत गौतमने इन्स्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'पहिलं मूल, वेलकम पप्पी मिया.
मियासोबत फोटो शेअर करत काजलने लिहिलं की, 'मी तुम्हाला माझ्या कुटुंबात आलेल्या नव्या सदस्याची माहिती देत आहे. जी आहे छोटी मिया. मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे की, मला लहानपणापासूनच डॉगचा फोबिया आहे. तर गौतम किचल्यू नेहमीच डॉग प्रेमी आहे.
तिने पुढे लिहिलं की, 'गौतम पाळीव प्राण्यांसोबत मोठा झाला आहे. आयुष्य आपल्याला प्रेम करायला शिकवते. मिया आपल्या जीवनात खूप मजा आणि उत्साह घेऊन आली आहे. हा प्रवास कसा असेल हे पाहण्यासाठी मी खूप उत्साही आहे.