विकी कौशल-कतरिना कैफ करणार बेबी प्लॅनिंग... पण आहे 'ही' अट?

Katrina Kaif Pregnancy: कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal Baby Planning) यांच्या बेबी प्लॅनिंगची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यासाठी सगळीकडेच सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या घरी कधी नवा पाहुणा येणार याबद्दल जोरात चर्चा रंगली आहे परंतु याबद्दल नवी माहिती समोर येते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 5, 2023, 04:18 PM IST
विकी कौशल-कतरिना कैफ करणार बेबी प्लॅनिंग... पण आहे 'ही' अट?  title=

Katrina Kaif Pregnancy: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif Pregnancy) यांच्याकडे नवा पाहूणा कधी येणार याची. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पुर्ण होतंय न होतंय तोच कतरिनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना (Katrina Kaif and Vicky Kaushal Baby Planning) कोण उधाण आलं होतं. परंतु आता अशी बातमी येते आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लवकरच बेबी प्लॅनिंग करणार आहेत.  त्याआधी आपले सर्व प्रोजेक्ट्स पुर्ण करण्याची तयारीत कतरिना आहे असं समोर आलेल्या रिपोर्ट्सवरून कळते आहे. 

मध्यंतरी कतरिना कैफचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Katrina Kaif Baby Bump Photos) झाला होता त्यात कतरिनाचं बेबी बंप दिसत असल्यानं सगळीकडेच कतरिना प्रेगंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे कतरिना आणि विकी कौशल बेबी प्लॅनिंगविषयी काय विचार करतायत याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. (katrina kaif and vicky kaushal soon to be planning for baby says reports)

लग्नानंतर प्रेग्नंन्सीच्या चर्चांना उधाण 

9 डिसेंबर 2021 साली कोणालाही न सांगता सावरता कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आपला विवाहसोहळा आपटला. त्यापुर्वी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगल्या होत्या. कधी आणि कुठे विकी आणि कतरिना स्पॉट होत आहेत. याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडियावरून आपल्या लग्नाचे फोटोही पोस्ट केले होते. त्यानंतर कधी एअरपोर्टवर तर कधी कुठल्या कार्यक्रमाला कतरिना स्पॉट (Katrina Kaif Spotted) झाल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीच्याच चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कतरिना प्रेग्नंन्ट नसून लवकरच हे बॉलिवूडचं पावर कपल बेबी प्लॅनिंग करणार आहे. त्यासाठी कतरिनाची एक अट आहे. 

हेही वाचा  -  'सासू'बाई जोरात! Nita Ambani यांच्या फ्लोरल गाऊननं वेधलं सगळ्यांचे लक्ष, किंमत वाचून झोपच उडेल...

आपलं काम पुर्ण झाल्याशिवाय कतरिना...

समोर आलेल्या ई टाईम्सच्या माहितीनुसार असं कळतंय की, कतरिनानं आपल्या काही मैत्रीणींना सांगितलंय की 'जी ले जरा' आणि 'मेरी ख्रिसमस' हे आपले दोन चित्रपट पुर्ण केल्याशिवाय ती आणि विकी कोशल बेबी प्लनिंग करणार नाहीत तर चित्रपटांचे चित्रिकरण पुर्ण झाल्यानंतर ते बेबी प्लॅनिंग करतील. त्याचसोबत सलमान खानसोबत कतरिनाही 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या कतरिना प्रचंड कामात दिसते आहे. या चित्रपटांसाठी कतरिनानं पुर्ण करण्याची कमिटमेंट दिली आहे. त्यामुळे कतरिना आणि विकी कौशलच्या घरी पाहुणा येणार कधी असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असताना आता याला कुठेतरी स्वल्पविराम लागलेला पाहायला मिळतो आहे. सगळ्यांनाच आता उत्सुकता आहे ती म्हणजे 'टायगर 3' कधी प्रदर्शित होणार याची!