'टिप टिप बरसा पानी' वर कतरिनाचा कातिलाना डान्स, रवीना टंडणवर कॅट भारी, पाहा व्हिडीओ

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

Updated: Nov 7, 2021, 08:42 PM IST
 'टिप टिप बरसा पानी' वर कतरिनाचा कातिलाना डान्स, रवीना टंडणवर कॅट भारी, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 26 कोटींच्या बंपर ओपनिंग सुरुवात केली आहे. या चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं काही वेळापूर्वीच यूट्यूबवर प्रदर्शित झालं असून, या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील कतरिना कैफ आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री लोकांना खूप आवडतेय. कतरिनाने तिचा किलर लूक ज्या पद्धतीने दाखवला आहे, त्यामुळे चाहत्यांना घाम फुटला आहे.

विशेष म्हणजे, हे गाणं रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं, जे सर्वकालीन सुपरहिट ठरलं होतं. अशा परिस्थितीत या गाण्याची मौलिकता टिकवून ठेवणं हे एक आव्हान होतं आणि हे आव्हान कतरिनाने पूर्ण केलं आहे. या गाण्याला लोक ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत, ते पाहता कतरिनाने तिच्या स्टाईलने रवीना टंडनला नक्कीच टक्कर दिली आहे असं म्हणता येईल. पाण्यात भिजलेल्या या लूकमध्ये हॉट दिसत आहेत.

या रिमिक्स व्हर्जनवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलंय की, 'रवीना बेस्टच आहे पण कतरिनालाही तोड नाही'. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, 'मला आवडलेलं पहिलं रिमिक्स'. त्याचबरोबर, काही युजर्स पहिलं गाणं सर्वोत्तम असल्याचं सांगत आहेत. विशेष म्हणजे अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशभरात ४००० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट जगभरात 5200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.