Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक

Kartik Aryan Bike Ride: लक्झरीयस गाड्यांचा मालक असलेला कार्तिक आर्यन मात्र यावेळी (Kartik Aryan Video) आपल्या जीमसाठी बाईकवर स्वार होऊन गेला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले कारण त्यानं ट्रॅफिकचे सगळेच नियम फोलो केले होते. सध्या त्याचा हा व्हिडीओ (Kartik Aryan Latest Gym Video) सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 12, 2023, 03:57 PM IST
Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक title=
Photo - Instagram

Kartik Aryan Bike Ride: कार्तिक आर्यन हा सध्याचा एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचीही (Kartik Aryan Bike Ride) अनेकदा चर्चा होताना दिसते. शून्यातून पुढे पुढे जात त्यानं आपला असा स्वत:चा फॅन बेस तयार केला आहे. मागच्या वर्षी 'भुलभुलैया 2' (Bhul Bhulaaiya 2) हा चित्रपट आल्यानंतर कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. काही दिवसांपुर्वी आपल्या आईबद्दलची एक भावनिक पोस्ट त्यानं इन्टाग्रामवर शेअर केली होती. या पोस्टला चाहत्यांकडूनही प्रतिसाद (Kartik Aryan Mother) मिळाला होता. आता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Kartik Aaryan rides bike on road ditching luxurious cars)

आपल्या सर्व महागड्या गाड्या सोडून कार्तिकनं चक्क बाईकवरून घरापासून ते जिमपर्यंतचे (Kartik AryanGym) अंतर गाठलं आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये कार्तिक आर्यनचीच चर्चा आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्तिक आर्यनचे कार कलेक्शन सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत. परंतु इतक्या महागड्या गाड्या सोडून कार्तिक आर्यननं मात्र आपली बाईक बाहेर काढली आणि आपल्या घरापासून ते त्याच्या जिमपर्यंत त्यानं ट्रॅफिक रूल्सचे (Traffice Rules) पालन करत बाईकवरून प्रवास केला आहे.

हेही वाचा - राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते की ही बाईक 15 लाख रूपयांची होती. यावेळी ब्लॅक आऊटफिटमध्ये तो दिसला होता. त्यानं बाईकवरून प्रवास करताना हेलमेट आणि हॅण्डग्लवजही घातले होते. त्याचसोबत त्यानं जिम लुक कॅरी केला होता. हल्ली सामान्य माणसंही ट्रॅफिकचे नियम पाळताना दिसत नाहीत. परंतु ट्रॅफिचे सगळेच नियम पाळल्यानं सगळीकडूनच कार्तिक आर्यनचे कौतुक होताना दिसते आहे. या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की, कार्तिक आर्यन हा बाहेर पडतो. आणि हेलमेट लावून आपल्या बाईकवर बसतो व आत्मविश्वासानं बाईक चालवतो. यावेळी त्यानं डोक्यावर कॅप लावली (Kartik Aryan Gym Look) आहे आणि डोळ्यावर सनग्लासेस लावले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कार्तिक आर्यननं बॉलिवूडच्या घराणेशाहीवरही अप्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. बॉलिवूडच्या बाहेरचा असला तरी कार्तिक आर्यननं आत्तापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मध्यंतरी लव आज कल 2 च्या वेळी कार्तिक आर्यन सारा अली खानला डेट करत असल्याच्या घटनांनी जोर धरला होता. आत्ताही ते अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. कार्तिकचा नुकताच 'शेहेजादा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. कार्तिक आर्यनचा 'सोनू की टिट्टी की स्विटी' (Kartik Aryan Upcoming Movie) हा चित्रपट बराच गाजला होता. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे.