मुंबईत फिरताना सेलिब्रिटींवर आली तोंड लपवण्याची वेळ

या फोटोमध्ये दोघांनीही आपला चेहरा झाकलेला दिसत आहे. 

Updated: Jun 6, 2019, 02:51 PM IST
मुंबईत फिरताना सेलिब्रिटींवर आली तोंड लपवण्याची वेळ title=

मुंबई : देशभरासह बॉलिवूड कलाकारांनीही बुधवारी ५ जून रोजी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचे दोन कलाकार अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन हे देखील मुंबईतील एका दरगाहमध्ये गेले होते. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सारा खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही आपला चेहरा झाकलेला दिसत आहे. पण त्यांच्यावर ही वेळ का आली...? 

मुंबईतील एकंदर गर्दी आणि सेलिब्रिटींप्रती असणारं चाहत्यांमधील कुतूहल पाहता सर्वसामान्यांना कोणातीही अडचण होऊ न देता ईदच्या या उत्साही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी कार्तिक आणि साराने ही शक्कल लढवली. 

कार्तिकने इन्स्टाग्रामवरुन दोघांचा फोटो शेअर करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फोटोवर अनेक कमेंट येण्यास सुरुवात झाली. फोटोमध्ये दोघेही मस्जिदच्या बाहेर उभे असल्याचं दिसत आहे. त्यांच्या मागे लोकांची गर्दीही दिसतेय. परंतु दोघांच्या गेटअपमुळे त्यांना कोणीही ओळखू शकलेलं नाही. 

 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा अली खाननेही आई अमृतासोबत ईदच्या दिवशी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांबाबत मोठी चर्चा होती. करण जोहरच्या चॅट शोमध्ये सारा अली खानने तिला कार्तिक आवडतं असून कार्तिकला डेट करायला आवडेल असंही म्हटलं होतं. दिल्लीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगवेळी सारा आणि कार्तिक डेटवरही गेले होते. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या फोटोमुळे दोघांबाबत चर्चा सुरु झाली आहे. कार्तिक आणि सारा लवकरच इम्तियाज अलीच्या 'लव आज कल' चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.