Box Office Report: 'भुलभूलैया 3' की 'सिंघम अगेन'; कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? कमाईचे खरे आकडे आले समोर

Bhool Bhulaiyaa 3, Singham Again Collection: बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिवाळीच्या मुहूर्तावर  'भुलभूलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) आणि  'सिंघम अगेन' (Singham Again) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 3, 2024, 05:36 PM IST
Box Office Report: 'भुलभूलैया 3' की 'सिंघम अगेन'; कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? कमाईचे खरे आकडे आले समोर title=

Bhool Bhulaiyaa 3, Singham Again Collection: बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिवाळीच्या मुहूर्तावर  'भुलभूलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) आणि  'सिंघम अगेन' (Singham Again) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही चित्रपट एकत्रित प्रदर्शित झाल्याने त्याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसेल अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र याउलट दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रुह बाबा विरुद्ध मंजुलिका हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना आवडलेलं दिसत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईच्या आकड्याांवरुन हे स्पष्ट दिसत आहे. 'भुलभूलैया 3' चित्रपटाने दोन दिवसांतच 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, दोन दिवसांत चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  

'भुलभूलैय्या 3' ने किती कमावले?

'भुलभूलैया 3' चित्रपटाने संपूर्ण जगभरात 107 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी निर्मात्यांनी निवेदन जारी केलं होतं. यामध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी 55.30 कोटी कमावल्याचं सांगण्यात आलं होतं. 

'सिंघम अगेन'ची कमाई किती?

दरम्यान दुसरीकडे 'सिंघन अगेन' या चित्रपटाला कडवी झुंज देत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार चित्रपटाने दोन दिवसात जगभरात एकूण 125 कोटी 20 लाख कमावले आहेत. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने सांगितलं की, प्रेक्षक त्याच्या प्रवासाला भारतीय स्वप्न म्हणून पाहतात. कार्तिक म्हणाला, “माझे प्रेक्षक माझ्या यशाकडे एक भारतीय स्वप्न म्हणून पाहतात ज्याच्याशी ते जोडले जातात. ते माझ्या प्रवासाशी, माझ्या चढ-उतारांशी अगदी वैयक्तिक पद्धतीने संबंधित आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे कारण बरेच अभिनेते आहेत आणि जे लोक या व्यवसायातले नाहीत, त्यांचाही माझ्या प्रवासाशी एक प्रकारे संबंध आहे. आणि आजूबाजूला कोणतीही हेराफेरी नाही. हाच सापेक्षता घटक आहे. कुठेतरी, मला असे वाटते की त्यांना वाटते की तो आपल्यापैकी एक आहे”.

कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीज बज्मी यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी कियारा अडवाणी, तब्बू आणि इतर कलाकार असलेल्या 'भूल भुलैया 2' मध्ये काम केले होते. या चित्रपटात तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, राजपाल यादव, विजय राज आणि इतर प्रमुख भूमिका साकारत आहेत.