'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करिनाची कामगिरी पाहून करिश्मा कपूर भावूक

करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बहीण करीना कपूरसोबत दिसत आहे. 

Updated: Oct 28, 2023, 06:06 PM IST
'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करिनाची कामगिरी पाहून करिश्मा कपूर भावूक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या आगामी 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. बेबोच्या चाहत्यांना या चित्रपटाची जितकी उत्सुकता आहे तितकी अभिनेत्रीची बहीण करिश्मा कपूर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

करिश्मा कपूर बनली बहीण करिनाची चीअरलीडर 
करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बहीण करीना कपूरसोबत दिसत आहे. दोन्ही बहिणी कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "नेहमीच तुझी चीअरलीडर असेल. #TheBuckinghamMurders मध्ये तु काय केलंयेस हे पाहण्यासाठी प्रत्येकजण प्रतीक्षा करू शकत नाही."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करिनाचा अभिनय पाहून करिश्माच्या डोळ्यात आलं पाणी.
यासोबतच करिश्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह अभिनेत्रीने आपल्या बहिणीच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं आहे. करिश्माने फोटोसोबत लिहिलं आहे की, "हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे... माझ्या बहिणीच्या अभिनयाने माझ्या डोळ्यात पाणी आलं." यासोबतच करिश्माने संपूर्ण स्टार कास्टचंही कौतुक केलं आहे.

कधी रिलीज होतोय करीना कपूरचा चित्रपट?
करीना कपूर खानचा हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माती म्हणून करिनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने आधीच आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. याशिवाय, या चित्रपटाची Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये फीचर फिल्म म्हणून देखील निवड झाली आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, करीना कपूर 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये जसमीत भामराची भूमिका साकारत आहे. जी एक पोलिस आणि सिंगल मदर आहे. जू एके दिवशी शूटिंग दरम्यान तिच्या मुलाला गमावते.