असे असेल तैमुरचे बर्थडे सेलिब्रेशन!

 बॉलिवूडची बेबो करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा पुढच्या महिन्यात वर्षाचा होईल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 28, 2017, 12:46 PM IST
असे असेल तैमुरचे बर्थडे सेलिब्रेशन! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची बेबो करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा पुढच्या महिन्यात वर्षाचा होईल. त्याच्या पहिल्या बर्थडे निमित्त करिना जबरदस्त प्लानिंग करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कुटुंबासमवेत एका पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तैमूरचा पहिला वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा करावा, अशी करिनाची इच्छा आहे. मात्र यात तुषार कपूरची मुले, करण जोहर आ्णि त्याची जुडवा मुले अशा जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाऊ शकते. 

तैमूरचा वाढदिवस २० डिसेंबरला आहे. या पार्टीसाठी रणधीर, बबिता कपूर,  शर्मिला टागोर आणि सोहा अली खान, कुणाल खेमू आपल्या मुलीसह सहभागी होतील. 

kareena kapoor khan, taimur

स्टार कीड तैमूर त्याच्या क्यूटनेसमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहीला. 'वीरे दी वेडिंग' च्या शूटिंगसाठी करिना तैमूर घेऊन दिल्‍लीला गेली होती.