'मी तो चित्रपट...', रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्यावर करीनाचं वक्तव्य चर्चेत

करीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 4, 2022, 08:48 PM IST
'मी तो चित्रपट...', रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्यावर करीनाचं वक्तव्य चर्चेत title=

मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या तिच्या आगामी चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच करीनाचा भाऊ आणि अभिनेता रणबीर कपूर ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याला अपेझित यश मिळालं नाही. यावर आता करीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. 

करीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘शमशेरा’च्या अपयशाबद्दल तिचं मत मांडल. याविषयी बोलताना करीना म्हणाली, “मी तो चित्रपट पाहिला नाही त्यामुळे त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीनं विचार करतो. काही जण चित्रपटाशी, कथेशी जोडले जातात, तर काहींना ती कथा तितकी आवडत नाही. प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे मी यावर भाष्य करण चुकीचं ठरेल.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

‘शमशेरा’ चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूरनं चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. ‘संजू’ चित्रपटानंतर रणबीरला मोठ्या पडद्यावर दुहेरी भुमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. परंतु या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना फारसे आवडले नाही आणि त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. तर रणबीरसोबत या चित्रपटात वाणी कपूर आणि सुनील दत्त दिसत आहेत. 

दरम्यान, करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा ‘रक्षाबंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.