अभी तो पार्टी शुरु हुई है! सेलिब्रिटींच्या हाय प्रोफाईल पार्टीत रात्री 2 वाजता नेमकं काय सुरु असतं? करीनाकडून मोठा खुलासा

करीनानं 'कॉफी विथ करण'मध्ये केला खुलासा...

Updated: Aug 5, 2022, 08:21 PM IST
अभी तो पार्टी शुरु हुई है! सेलिब्रिटींच्या हाय प्रोफाईल पार्टीत रात्री 2 वाजता नेमकं काय सुरु असतं? करीनाकडून मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. करीना आणि अभिनेता आमिर खाननं दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीना आणि आमिरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, करीनानं बॉलिवूडच्या पार्टीत रात्री 2 वाजता नेमकं काय सुरु असतं याचा खुलासा केला आहे. 

करणनं त्याच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. यापैकी एक म्हणजे अभिनेता आमिर खान होता. आमिरनं करणच्या पार्टीच हजेरी देखील लावली पण त्याला ही पार्टी आवडली नाही. त्याविषयी बोलताना करीना म्हणाली की आमिर खूप बोरिंग आहे. तर करण आमिरला पार्टी पूपर म्हणाला. हे ऐकताच आमिर म्हणाला, पार्टीत खूप लाउड म्यूजिक असतं, जे त्याला आवडत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे आमिर म्हणाला, मी  पार्टीत 10 वाजता आला. त्यावेळी म्युझिक खूप लाउड होतं आणि कोणी डान्स सुद्धा करत नव्हतं. तिथे उपस्थित असलेले लोक एकमेकांशी बोलण्यासाठी मोठ मोठ्यानं बोलत होते आणि त्यांच्या शिरा दिसत होत्या. तर आवाज कमी करत न ओरडता बोलायला पाहिजे आणि ते लोक बोलतात की मी बोरिंग आहे. 

करीनानं केला खुलासा
आमिर खानच्या या उत्तरावर, करीना कपूरनं खुलासा केला आणि म्हणाली आमिर, सहसा पार्टीमध्ये येणार लोक शॉट घेतात आणि त्यांच्याच हिंदी गाण्यांवर नाचतात. करिनाने असेही सांगितले की, जर पार्टीत 200 लोक असतील तर आमिर त्यांच्या उलट दिशेने जातो. तर आमिर पार्टीत 10 वाजता येतो, पार्टीला आलेल्यांनी रात्री 2 वाजल्यापासून बेफान नाचण्यास सुरुवात केली होती असं म्हणत या सेलिब्रिटी पार्टीमध्ये नेमकं काय होतं याला गौप्यस्फोट करीनानं केला. 'पार्टीला आलो म्हणजे धमाल, मजा मस्ती... इतकंच काय ते', असं म्हणताना करीनानं बी टाऊन सेलिब्रेशनचं चित्र सर्वांसमोर ठेवलं.