करीना गरोदरपणात सैफपासून राहायची दूर, कसं होतं 'खासगी आयुष्य'?

करीनाने आपल्या आयुष्यातील 'त्या' दिवसांचा केला खुलासा 

Updated: Aug 10, 2021, 10:24 AM IST
करीना गरोदरपणात सैफपासून राहायची दूर, कसं होतं 'खासगी आयुष्य'? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आपला बेस्ट फ्रेंड आणि फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) सोबत पुस्तक लाँच करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. या गप्पांमध्ये करीनाने आपल्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. गरोदरपणात करीना आपल्या सेक्स लाईफबद्दल अतिशय सावध होती. (Kareena Kapoor reveals she lost her sex drive during pregnancy, what is saif reaction?) 

प्रेग्नेसी दरम्यान करीना सेक्सपासून दूर राहत होती. सैफ अली खान देखील ही गोष्ट समजत होता. आणि  त्याने करीनाला याबाबत खूप सपोर्ट देखील केला. करीना कपूरने याबाबत खुलासा केला आहे की, गरोदरपणात एक स्त्री वेगवेगळ्या भावनांमधून जात असते. 

पुढे करीना सांगते की, या काळात स्त्री स्वतःला खूप खास आणि सेक्सी समजत असते. अगदी सैफने देखील ही गोष्ट मान्य केली. गरोदरपणात करीना अतिशय सुंदर दिसत होती. 

एवढंच नव्हे करीना म्हणते की, सहाव्या आणि सातव्या महिन्यात खूप थकवा जाणवतो. त्या काळात जोडीदाराचा किंवा जवळच्या व्यक्तीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. अशावेळी आपल्या जोडीदाराने रेग्युलर सेक्स लाइफ सुपर ऍक्टिव असेल अशी आशा करणं चुकीचं आहे, अस देखील बेबो म्हणाली. 

गरोदरपणात स्त्रीच्या प्रत्येक महिन्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्या गरोदर स्त्रीच्या मनाप्रमाणे व्हायला हवं. जर ही गोष्ट तुमच्या नवऱ्याला कळत नसेल. तर तो तुमच्या वडिलांचा बाप कसा असू शकतो? त्याला तुम्हाला सगळ्या बाजूने समजून घ्यायला हवं. 

करीनाने दुसऱ्या बाळाचं नाव "जेह' ठेवल्याची चर्चा रंगली. मात्र हे नाव खरं नाही. करीनाने 'जहांगीर' असं बाळाचं नाव ठेवलं आहे. जहांगीरला सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीना आणि सैफ करत आहेत.