Kareena Kapoor: बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटल्यानंतर करीनाचं मोठं पाऊल? लवकरच उघडणार गुपितं...

Kareena Kapoor: करीना कपूरचा शेवटचा सिनेमा फारच वाईट पद्धतीनं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पडला. लाल सिंग चड्ढाला (Lal Singh Chaddha) प्रेक्षकांनी पाहणं नाकारलं आणि हा चित्रपट एवढ्या चांगल्या कथेवर आधारित असून सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.

Updated: Jan 20, 2023, 07:01 PM IST
Kareena Kapoor: बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटल्यानंतर करीनाचं मोठं पाऊल? लवकरच उघडणार गुपितं...  title=

Kareena Kapoor: करीना कपूरचा शेवटचा सिनेमा फारच वाईट पद्धतीनं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पडला. लाल सिंग चड्ढाला (Lal Singh Chaddha) प्रेक्षकांनी पाहणं नाकारलं आणि हा चित्रपट एवढ्या चांगल्या कथेवर आधारित असून सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. तेव्हा आमिर खान आणि करीना कपूर भरभरून प्रमाणात ट्रोल झाले होते या दरम्यान करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल (Kareena Kapoor Viral Video) झाला होता. या व्हिडीओत ती बिनधास्तपणे म्हणताना दिसते की, तुम्हाला जर का आमचे पिक्चर पाहायला येऊ नका... तिच्या याच वक्तव्याला धरून तेव्हा लाल सिंग चड्ढाच्या अपयशावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळत असं यावेळी नेटकरी म्हणाले होते आणि करीना आणि आमिरची खिल्ली उडवण्यात आली होती. (kareena Kapoor posts new teaser on instagram netizens guesses sequal of ravaan film shahrukh khan entertainment news in marathi)

परंतु आता आमचे चित्रपट पाहायला येऊ नका म्हणणाऱ्या करीनानं आता बरोबर उलट काम केलं आहे. मागच्या वर्षी आपल्या चित्रपटाला कडाडून विरोध झाल्यानंतर आणि प्रेक्षकांनी पाठ फिरावल्यानंतर करीनाला वेगळीच उपरती झाल्याचे दिसते आहे. ती तिच्या इन्टाग्रामवर (Instagram Post) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं एक छोटासा टिझर शेअर केला आहे ज्याची अधिकृत घोषणा ती येत्या सात दिवसानंतर म्हणजेच 27 जानेवारीला करणार असल्याचे तिनं खाली म्हटले आहे. 

त्यामुळे यावरूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. करीना ही आता कसली उपरती झाली आहे याबद्दलही नेटकरी प्रश्न विचारत आहेत. त्यातून सध्या ती आपल्या येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल (Kareena Kapoor New Projects) सोशल मीडियावरून प्रेक्षकांना अपडेट करते आहे. त्यावरून आता असे स्पष्ट होते की ती आपल्या प्रेक्षकांना आपले येणारे चित्रपट आवर्जून पाहा असं सांगायचा प्रयत्न करते आहे. 

हेही वाचा - Health Tips: आजचं सुरू करा खजूराचे सेवन, पाहा खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे...

या तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुपरहिरो (Superhero) स्टाईलमध्ये आकाशातून जमिनीवर उडी मारताना दिसते आहे तिच्या बाजूला दोन बॉडी असल्यासारखी माणसंही उभी आहेत. त्यातून मध्ये फिल्मी स्टाईलमध्ये वीजही चमकते. लॅंडिग सून... म्हणजेच लवकरच उतरेन असं कॅप्शनमध्ये प्रेक्षकांना आव्हानही केलं आहे. यावरून स्पष्ट आहे की करिना तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. ज्याची घोषणा ती लवकरच करणार आहे. या चित्रपट सुजॉय घोषचा (Sujoy Ghosh) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या तिच्या चाहत्यांना तिच्या या नव्या चित्रपटाची आतुरताही लागून राहिलेली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

येत्या काळात तिचे तीन अजून काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. अद्याप तिनं आपल्या या नव्या चित्रपटाविषयी कुठलीच घोषणा केलेली नाही.