Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च

Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

Updated: Jan 20, 2023, 06:44 PM IST
Raveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च title=

Raveena Tandon Daughter Rasha Debut In Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून रवीना आणि तिची लेक राशा थडानी (Rasha Thadani) सतत चर्चेत आहे. सुहाना खान (Suhana Khan) आणि न्यासा देवगणनंतर (Nysa Devgn) सतत चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी आता राशा थडानी एक आहे.  राशा ही 17 वर्षांची आहे. सुहानानंतर आता राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) राशाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. राशा ही बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत (Ajay Devgn) स्क्रिन शेअर करणार आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, अभिषेक कपूरनं या प्रोजेक्टसाठी काम सुरू केले आहे. या चित्रपटाचे नाव अजून ठरवण्यात आले नाही. अजय देवगणची या चित्रपटात महत्तवाची भूमिका आहे. तर अजयचा पुतण्या अमान देवगण देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अजय देवगण कधीही न दिसलेल्या अवतारात या चित्ररपटात दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिषेक कपूर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टवर काम करत होता. यासाठी अजय देवगणचे नाव मनात फायनल होते. अजयचा पुतण्या अमन देवगण याला चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करण्यात आले आहे. पुतण्या अमनच्या या पदार्पणाबद्दल काजोलही उत्साहित आहे. अमन हा न्यासा देवगणचा चुलत भाऊ आहे आणि त्याला मॉडेलिंगचीही आवड आहे. रिपोर्ट्सनुसार विश्वास ठेवला तर, अभिषेकनं अमन आणि राशाची जोडी असून त्या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहे. प्रज्ञा कपूर आणि रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबाबत अद्याप अभिषेक आणि अजय दोघांपैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा : Aaradhya ला का ट्रोल करताहेत नेटकरी? Aishwarya Rai ला ही दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अभिषेकनं आता पर्यंत सुशांत सिंह राजपूत, फरहान अख्तर, राजकुमार राव, सारा अली खानसारख्या अनेक कलाकारांना लॉन्च केले. त्यामुळे अमन आणि राशासाठी ही एक उत्तम संधी असेल असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अमन आणि राशा हे लहान असून सध्या त्यांना ट्रेनिंग सेशन देण्यात येत आहे. रवीनानं 2004 साली अनिला थडानीशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून राशा आणि रणबीर अशी त्यांची नावं आहेत. लग्नाआधी रवीनानं दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यांची नावं पूजा आणि छाया असे आहे. दुसरीकडे अजयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसला होता. लवकरच अजय रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे.