सिनेमा माझ्या रक्तात आहे- करिना कपूर

 करिना म्हणाली की, सिनेमाला भाषा, धर्माची मर्यादा नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 23, 2018, 10:30 PM IST
सिनेमा माझ्या रक्तात आहे- करिना कपूर title=

मुंबई : बंगळूरमध्ये झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला करिनाने उपस्थिती लावली. फिल्म फेस्टिवलचे उद्घाटनप्रसंगी करिना म्हणाली की, सिनेमाला भाषा, धर्माची मर्यादा नाही. ज्यांची काही भाषा नाही त्यांनाही सिनेमा एकत्र जोडतो. सिनेमाला कोणत्याही धार्मिक सीमा नाही आहेत. करिना पुढे म्हणाली की, सिनेमा माझ्या रक्तात आहे. सिनेमा माझी पॅशन आहे आणि त्यामुळे माझ्या आत्म्याला तृप्ती मिळते. 

करिनाने येथे आपले आजोबा राज कपूर यांच्या कर्नाटक प्रेमाविषयी ही सांगितले. राज कपूर यांना म्हैसूर बद्दल अतिशय प्रेम असल्याचे तिने सांगितले.

या कार्यक्रमात करिना लाल बॉर्डरच्या साडीत दिसली. कन्नड सिनेमात काम करण्याचीही इच्छा करिनाने येथे व्यक्त केली. त्याबद्दल ती म्हणाली की, मला ही भाषा येत नाही पण मी आशा करते की एक दिवस मी तुमच्या भाषेत तुमचे मनोरंजन करू शकेन.

प्रेग्‍नेंसीच्या ब्रेकनंतर करिना पुन्हा एकदा वीरे दी वेडींग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सोनम कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्रीही आहेत. 
कर्नाटक चिफ सेक्रेटरी रत्न प्रभा यांच्यासोबत बोलताना करिना कपूर खान.

कर्नाटक मंत्री रोशन बेग आणि फिल्ममेकर ओम प्रकाश मेहरा यांच्यासह  करिनाने फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन केले.