मुंबई : अलीकडेच करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात भांडण झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. निशा रावलने करण मेहरावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आणि करण मेहराने पत्नीच्या भावासोबतचं अफेअरबद्दल सांगितलं. आता त्यांचं नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. आता निशा आणि करणला त्यांच्या नात्याला दुसरी संधी द्यायची नाही आणि आता त्यांच्या अटींवर आयुष्य जगायचं आहे. नुकतंच करण मेहराने असं वक्तव्य केलं आहे की, सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
करण मेहराने अलीकडेच दावा केला आहे की, जॉनी डेपप्रमाणेच त्याला त्याचा घटस्फोट लाइव्ह स्ट्रीम करायचा आहे. इतकंच नाही तर करण मेहराने असंही म्हटलं आहे की, त्याच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आरजे सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत करण मेहरा म्हणाला की, अंबर आणि जॉनी डेपच्या बाबतीत जसं घडलं होतं तसं मला घटस्फोटाचं प्रकरण थेट प्रक्षेपित करायचं आहे. भारताचा कायदा याची परवानगी देत नाही ही वेगळी बाब आहे.
पुढे करण मेहरा म्हणाला, कायदेशीर अडचणीत सापडल्यानंतर मी खूप काही शिकलो आहे. तुम्ही आमच्यासोबत केस लाईव्ह दाखवू शकत नाही. माझी अशी इच्छा आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. कोर्टाला दाखवण्यासाठी मी 1500 पाने लिहिली आहेत. प्रत्येक पान मी स्वतः लिहिलं आहे. आता माझ्यासाठी काहीही अर्थ नाही.
2012 मध्ये लग्न केलं
करण मेहरा आणि अभिनेत्री निशा रावल यांची भेट 2008 मध्ये 'हंस्ते-लाफ्स' शोच्या सेटवर झाली होती. त्यावेळी करण असिस्टंट स्टायलिस्ट होता आणि निशा त्या शोमध्ये लीड एक्ट्रेस होती. या शोमध्ये दोघं मित्र झाले आणि नंतर प्रेमात पडले. यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. आता दोघांनाही एक मूल आहे ज्याचं नाव कविश मेहरा आहे. या मुलाच्या ताब्यासाठी दोघंही भांडत आहेत.
निशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल म्हणाली
काहि दिवसांपूर्वी झालेल्या press conferece मध्ये निशाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितलं की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जबाबदार धरत नाही. याशिवाय तिने करणला हे सगळे खेळ खेळणं थांबवण्यास सांगितलं आणि त्याला सभ्य पद्धतीने लढण्यास सांगितलं. निशा म्हणाली, 'मला माझी आणि माझ्या मुलाची भीती वाटते.
उद्या माझ्या मुलाने हा व्हिडिओ पाहिला तर? मी घरातून बाहेर पडले आणि माझ्या मुलासमोर कोणी असं काही बोललं तर?' याशिवाय निशा म्हणाली, 'मला माझ्या मुलाला चांगल्या वातावरणात वाढवायचं आहे आणि जर करणला तेच हवं असेल तर त्याने मागे हटावं'.
ईमेज खराब करण्यासाठी केलं
यादरम्यान निशा म्हणाली की, मला अशा लोकांना महत्त्व द्यायचं नाही जे करणला त्याची प्रतिमा डागाळण्यासाठी मदत करत आहेत. करण चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. निशाने असा दावा केला आहे की, ती जे काही करत आहे ते तिच्या मुलासाठी आहे म्हणून तिला सर्वकाही शांततेत हवं आहे. निशा पुढे म्हणाली, 'जर करणला काही हवं असेल तर त्यासाठी कायदा आहे'. याआधी करणने दावा केला होता की निशा आपल्या मुलाचा सहानुभूती मिळविण्यासाठी वापर करत आहे.