"माझे लाईफ फारसे इंटरेस्टिंग...", या तापसीच्या वक्तव्यावर करण जोहर म्हणाला...

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोवर तिखट प्रतिक्रिया दिली.

Updated: Sep 29, 2022, 04:29 PM IST
"माझे लाईफ फारसे इंटरेस्टिंग...", या तापसीच्या वक्तव्यावर करण जोहर म्हणाला... title=

Koffee with Karan 7 Reaction On Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शोवर तिखट प्रतिक्रिया दिली. करणच्या शोमध्ये तापसीला अजूनही आमंत्रित करण्यात आलं नाही. यावर प्रतिक्रिया देताना तापसी म्हणाली की, 'माझे सेक्स लाईफ फारसे इंटरेस्टिंग नाही, त्यामुळे शोमध्ये आमंत्रित केलं नाही.' आता करण जोहरने तापसीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शोच्या शेवटच्या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यात तन्मय भट, कुशा कपिला, निहारिका एनएम आणि दानिश सैत दिसत आहेत.

'कॉफी विथ करण 7'च्या 12व्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये जेव्हा कुशाने करणला विचारले की, 'गेल्या दोन वर्षांत ज्या स्टार्सला यश मिळाले आहे त्यांना अद्याप 'कॉफी विथ करण'मध्ये बोलावलं नाही. त्यापैकी एक म्हणजे तापसी पन्नू. शोमध्ये येण्यासाठी काही मापदंड आहेत का?' या प्रश्नाला उत्तर देताना करण म्हणाला- 'हा 12वा भाग आहे आणि तुम्हाला कॉम्बिनेशनची गरज आहे'. करण जोहर पुढे म्हणाला, 'मी तापसीला एवढेच सांगेन की मी तिला माझ्या शोमध्ये बोलावले आणि तिने नकार दिला तर मला दुःख होईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'कॉफी विथ करण'च्या 7 व्या सीझनमध्ये कतरिना कैफ, विकी कौशल, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, सोनम कपूर, आमिर खान, करीना कपूर खान, अक्षय कुमार, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभूसारखे स्टार्स दिसले आहेत.