पंतप्रधान मोदींनी या कलाकारांची घेतली भेट

भेटीमागचं हे कारण 

पंतप्रधान मोदींनी या कलाकारांची घेतली भेट  title=

मुंबई : भारतीय सिनेमा आणि मनोरंजन जगतातील प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मनोरंजन उद्योगाकरता जीएसटीच्या दर कमी करून एक समान ठेवण्याची मागणी केली आहे. 

अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, निर्माता करण जोहर, राकेश रोशन, सेंसर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी आणि प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर मोदी यांच्याशी भेटण्यासाठी गेले होते. 

PIB द्वारे जाहिर केलेल्या वक्तव्यानुसार, प्रतिनिधीमंडळने मोदी यांना भारतात मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील विकासाची व्यापक रुपरेषा सादर केली. तसेच पुढील काळात भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला देश बनवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले. 

फिल्म जगतातील सदस्यांनी भारतातील मनोरंजन उद्योगाकरता जीएसटीचा दर कमी करून समान ठेवण्याची मागणी यावेळी केली. मुंबईला मनोरंजनची वैश्विक राजधानीच्या रुपात विकसित करणार असून मोठा बदल करणार असल्याचा शब्द दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय मनोरंजन उद्योग हा संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या उद्योगामुळे विश्वात भारताची प्रतिष्ठा वाढण्यात सर्वाधिक मदत होत आहे. त्यांनी प्रतिनिधीमंडळाला आश्वासन दिलं आहे की, केंद्र सरकार मीडिया आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रासोबत आहे. याचा ते सकारात्मक विचार करतील. या अगोदर या प्रतिनिधी मंडळाने ऑक्टोबरमध्ये मोदी यांच्याशी दिल्लीत भेट घेतली होती.