'... तर अनुष्काचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपलं असतं', करण जोहरचं मोठं वक्तव्य

अनुष्का केवळ टॉपची अभिनेत्रीच नाही तर आता ती चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मितीही करते. 

Updated: Jan 8, 2022, 02:57 PM IST
'... तर अनुष्काचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपलं असतं', करण जोहरचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आज बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. अनुष्का केवळ टॉपची अभिनेत्रीच नाही तर आता ती चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मितीही करते. अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवार शाहरुख खानसोबत केली. तिचा 'रब ने बनादी जोडी' हा डेब्यू सिनेमा होता. ज्यानंतर तिच्या करिअरचा ग्राफ वर चढत गेला. त्यानंतर तिने 'बॅण्ड बाजा बाराती', 'पीके' सारखे अनेक चित्रपट केले. परंतु आता अनुष्का आपल्या करिअरमध्ये उंचीवर पोहोचली असताना दिगदर्शक करण जोहरचं एक वक्तव्य सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

यामध्ये करणने अनुष्काला सिनेमात संधी नको देऊस असे दिग्दर्शकाला सांगितले होते.

आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की सर्वत्र ही चर्चा आणि वाद नेहमीच होत असतो की, करण जोहर नेहमीच स्टार्स किड्सनाच सिनेमात संधी देतो. त्यामुळे त्याने अनुष्काला सिनेमात संधी देऊ नका असं वक्तव्य केल्यानंतर अनुष्काचे चाहते, त्याच्यावर रागवले होते. परंतु ही कहाणी नंतर बदलली.

जर चित्रपट निर्माता आदित्य चोप्राने करण जोहरचे म्हणणं 2008 मध्ये ऐकले असते तर, कदाचित आज अनुष्काचे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपले असते

होय, हे खरे आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'रब ने बना दी जोडी'मध्ये करण जोहरला अनुष्काला संधी द्याचे नव्हती, यामुळे त्याने आदित्य चोप्राला देखील तसे न करण्याचा सल्ला दिला.

या गोष्टीचा खुलासा करण जोहरणं स्वत: एका मुलाखतीत केला होता. करण जोहर म्हणाला, 'मी आदित्यला अनुष्का शर्माला चित्रपटात कास्ट करू नये यासाठी खूप प्रयत्न केले. आदित्यने मला अनुष्काचे फोटो दाखवले ज्यावर मी त्याला म्हणालो की तू वेडाआहेस का? 'रब ने बना दी जोडी'च्या शूटिंगदरम्यान, अनुष्का वधूच्या गेटअपमध्ये बसली होती आणि हा तिचा पहिला शॉट होता, जो पाहून माझ्या आईने मला सांगितले की, ती कुठेतरी हरवल्यासारखी दिसत आहे.'

करण पुढे म्हणला, 'आदित्य चोप्रा अनुष्काला कास्ट करू इच्छित आहे हे जाणून मला धक्का बसला, मी अनुष्काकडे पाहिले आणि मला आश्चर्य वाटले की, आदित्यला तिच्यात काय दिसले असेल. मात्र, जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मला आदित्यचा निर्णय योग्य वाटला.' यानंतर करण जोहरनं त्याची चुकी मानली आणि हे मान्य केलं की अनुष्का एक चांगली अभिनेत्री आहे. अनुष्कानं देखील तिच्या जिद्दीने सगळ्यांना तिच्यामधील टॅलेंट दाखवून दिलं.