त्या घटनेनंतर स्वतःला ओळखूही शकत नव्हती दीपिका पादुकोण

दीपिकाच्या आयुष्यातील ती घटना...  

Updated: Jan 8, 2022, 02:43 PM IST
त्या घटनेनंतर स्वतःला ओळखूही शकत नव्हती दीपिका पादुकोण title=

मुंबई : कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कोरोनाला झुंज दिली आहे. कोरोनामुळे अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचा जीव गमावला. गेल्या वर्षी मे महिन्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणही कोविड-19च्या विळख्यात सापडली होती. नुकताचं एका मुलाखतीत दीपिकाने कोरोनामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल खुलासा केला. 

दीपिका म्हणते, माझ्या मते पहिला लॉकडाउन खूप वेगळा होता. कारण तेव्हा काही कळत नव्हतं की आता जगात काय होईल. त्यानंतर दुसरं लॉकडाऊन माझ्यासाठी फार वेगळा होता. कारण माझ्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे दीपिका म्हणते,  'कोविडनंतर माझ्यात शारीरिक बदल झाले. मी स्वतःला ओळखू शकत नव्हते. मला वाटतं ते औषधांमुळे, स्टिरॉइड्समुळे होतं. ' कोरोनानंतर मी फार अशक्त झाले होते. त्यानंतर मला दोन महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. ती वेळ माझ्यासाठी कठीण होती असं देखील दीपिका म्हणाली. 

कोरोनाच्या या वाईट टप्प्यातून गेलेली दीपिका आता कामावर परतली आहे.  ती लवकरचं ' गहराइया' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रटात दीपिका शिवाय सिद्धांत चर्तुवेदी, अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.