करण जोहरसह संपूर्ण कुटूंब १४ दिवस क्वारंटाईन, २ नोकरांना कोरोनाची लागण

करण जोहरने ४८ वा वाढदिवस केला साजरा 

Updated: May 25, 2020, 09:44 PM IST
करण जोहरसह संपूर्ण कुटूंब १४ दिवस क्वारंटाईन, २ नोकरांना कोरोनाची लागण  title=

मुंबई : करण जोहर आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र हा क्वारंटाईन वाढदिवस त्याच्यासाठी थोडा भीतीदायकच ठरला आहे. करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या दोघांनी घराच्या बिल्डींगमधील वेगळ्या भागात ठेवण्यात आलं आहे. 

करण जोहरने याबाबत बीएमसीला माहिती देताच संपूर्ण बिल्डिंग सॅनिटाइज केली असून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सगळ्यांना सक्तीचं होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे. 

संपूर्ण घरात काम करणाऱ्या नोकरांच आणि कुटुंबातील सगळ्यांची स्वॅब टेस्ट घेतली आहे. या सगळ्यांचे निकाल निगेटिव्ह आले आहे. मात्र असं असलं तरीही संपूर्ण कुटुंबाला १४ दिवसांकरता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून सगळ्यांनी नियमांच काटेकोरपणे पालन केलंय.